मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील रुग्णालयात उपचार सुरू

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील रुग्णालयात उपचार सुरू

-----------------------------------------------------------------------------------

आंतरवाली सराटी (पंढरी नगरी न्यूज ) मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण अस्त्र उगारले होते. सरकारच्या वतीने आलेल्या शिष्टमंडळाने आश्वासनानंतर सलग नऊ दिवसांच्या कालावधीने जरांगेंनी आपले उपोषण आंदोलन स्थगित केले आहे. मात्र, या नऊ दिवसांत जरांगेंची प्रकृती खालवली होती, त्यांना बोलताना त्रास जाणवत होता. उपोषण स्थगितीनंतर जरांगे वैद्यकीय उपचार घेत आहेत. डॉ. चावरे यांनी जरांगेच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

मनोज जरांगे पाटील रुग्णालयातमराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी उपोषण मागे घेतले. गेल्या नऊ दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरु होते. उपोषण सुरु असताना त्यांनी वैद्यकीय उपचार करुन घेण्यास नकार दिला होता. उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या किडनी अन् लिव्हरवर सूज आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.