सिद्धेवाडी येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन..!

सिद्धेवाडी येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन..!

-------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज ) : सिद्धेवाडी ता.पंढरपूर येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व ज्ञान सूर्य भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

यावेळी महामानव ज्ञान सूर्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा वाचनालयाचे संस्थापक सचिव तानाजी जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालून बाबासाहेबांना आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले, यावेळी बोलो रे बोलो जय भीम बोलो अशा घोषणा देण्यात आल्या कार्यक्रमात वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पाटील ,उपाध्यक्ष दिगंबर जाधव सर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक राजकीय कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास वाचनालयाचे संचालक आत्माराम शिंदे ,सुभाष जाधव, मंदाकिनी सावंतराव ,बाबुराव सावंतराव ,ग्रामपंचायत सदस्य रमेश बनसोडे, विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी दत्तात्रय गोडसे ,गोकुळ जाधव ,विजय जाधव, साहेबराव जाधव ,अशोक जाधव, सर्जेराव मस्के ,मारुती जाधव ,समाधान जाधव ,ग्रंथपाल समाधान जाधव, धनाजी घुले, सिद्धेश्वर जाधव ,संभाजी काळे विश्वास जाधव. रावसाहेब भोपळे. इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.