मौजे भालेवाडी येथे "आपला संकल्प विकसित भारत " उपक्रम संपन्न.
-----------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज ) मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी येथे आपला संकल्प विकसित भारत यात्रा उत्साहात संपन्न झाली. सदर कार्यक्रमाचे उद्घघाटन उपस्थित महिलांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात विविध विभागाच्या लाभार्थी यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शासनाच्या ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग, बचत गटासाठी असणाऱ्या विविध योजना यांची माहिती देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमास सरपंच श्रीकांत दवले, समाज कल्याण समितीचे माजी मिस्टर सभापती सभापती सचिन शिवशरण, जिल्हा शेतकरी संघटना फेडरेशन चे अध्यक्ष अविनाश गवळी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटा मुक्त अध्यक्ष, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.