मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीवर सर्व जागा जिंकुन आवताडे यांचे वर्चस्व कायम

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीवर सर्व जागा जिंकुन आवताडे यांचे वर्चस्व कायम

-----------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा(पंढरी नगरी न्यूज) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ५ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी बबनराव अवताडे व विद्यमान आ. समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे पाच ही उमेदवार मोठ्या मताच्या फरकाने विजयी झाले संस्था मतदारसंघात राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षांचा  अवघी दोन मध्ये पडून त्यांचा दारुण पराभव झाला. १८सर्व जागा जिंकून बाजार समितीत अवताडे यांनी  अखेर वर्चस्व  कायम ठेवले आहे.

१८ जागा असलेल्या बाजार समितीमध्ये १३ जागा यापूर्वी आवताडे चुलते पुतण्यांनी एकत्र येत  १३ जागा बिनविरोध करण्यात आले. पाच जागामध्ये संस्था मतदारसंघातील दोन व ग्रामपंचायत मधील तीन अशा पाच जागांसाठी ९ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यांमध्ये होते आज सलगर बु, भोसे,मंगळवेढा, या तीन मतदान केंद्रावर जवळपास  ९२ टक्के मतदान झाले. मतदानानंतर इंग्लिश स्कूलमध्ये मतमोजणी घेण्यात आली संस्था मतदारसंघांमध्ये ९२५ पैकी ८०० मतदान झाले. त्यापैकी चार मते बाद झाली, संगीता कट्टे यांना अवघी दोन तर यांना कविता बेदरे,सविता यादव यांना प्रत्येकी प्रत्येकी ७९४ इतकी मते पडली. ग्रामपंचायत मध्ये एकूण ५६५ पैकी इतके मतदान झाले होते त्यामध्ये जगन्नाथ रेवे ४३६व गंगाधर काकणकी ४४१  व सोमनाथ माळी १०१ यांना इतकी मते पडली, या प्रवर्गात सोमनाथ माळी यांचा पराभव झाला तर ग्रामपंचायत विभागातील एका राखीव जागेसाठी पांडुरंग कांबळे ४२०, हौसाप्पा शेवडे ८२ वैभव सोनवणे फक्त एक मत पडले या प्रवर्गात पांडुरंग कांबळे हे विजयी झाले.पाच जागेसाठी च्या मतदानामध्ये पाचही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले,बाजार समितीच्या गत निवडणुकीत देखील अवताडे गटाने १८ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले यंदाच्या निवडणुकीत १३ यापूर्वीच बिनविरोध केल्या व निवडणूकीतून ५ अशा १८ जागा जिंकून सहकारी संस्थेत आवताडे यांचे प्राबल्य कायम राहिले. दामाजी नंतर दुसरी मोठी सहकारी संस्था ताब्यात घेण्याचा समविचारीने प्रयत्न केला परंतु पुरेशे मतदार नसल्यामुळे त्यांनी या निवडणुकीत माघार घेतल्याचे जाहीर केले. शेतकऱ्याशी संबंधित असलेल्या या सहकारी संस्थेवर मतमोजणीनंतर वर्चस्व आबादीत राहिल्याबद्दल अवताडे समर्थक आणि फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.