आषाढी यात्रेच्या मुहूर्तावर पंढरपुरात घाणीचे साम्राज्य यास जबाबदार कोण?

आषाढी यात्रेच्या मुहूर्तावर पंढरपुरात घाणीचे साम्राज्य यास जबाबदार कोण?

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) : भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाच्या पंढरी नगरीत आषाढी एकादशी, चैत्री एकादशी , कार्तिक एकादशी, माघ एकादशी निमित्त राज्य तसेच परराज्यातील भाविक भक्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येतात. या वारीसाठी राज्य सरकारकडून भरघोस निधी ही येतों.आणि घोषणा केली जाते. पण ते ही फक्त वारी जवळपास येतांनाच त्यानंतर पंढरपूरचा कायापालट तर सोडाच पण पंढरपूरतील केर-कचराही साफ होत नसल्याचे उघडकीस आले आहे.

पण यामुळे पंढरपूरकरांच्या जीवावर बेतत आहे या घाणीच्या दुर्गंधीचा सदुपयोग पंढरपुरच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी होत आहे की काय?असा प्रश्न पंढरपूरतील नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे. अनेक ठिकाणी केर कचऱ्याचे खच  पडलेल्या अवस्थेत आपणांस पहावयास मिळतात आणि त्यातच आता तर पावसाळ्यात पाण्याने तुडुंब भरून नाले देखील वाहतील यात शंकाच नाही कारण जर केर कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसेल तर नालेसफाईच्या बोलाबाल्याचे काय?हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.

पण सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जाते आणि त्यांच्या जीवनाची कोणत्याही प्रकारे कोणालाही काही देणे - घेणे नसल्याचे दिसून येत आहे. बेजबाबदार नगर पालिका अधिकारी जबाबदारी सांभाळत नसल्याने दिसत असून चर्चा पंढरपूरकरांमध्ये रंगली आहे. त्यामुळेच वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरकारांचे स्वच्छता करण्यासाठी मागील अनेक वर्षे गाजर हलवा खाऊन पंढरपूरचे नागरिक कंटाळलेले आहेत पण सरकाने गाजर देणं थांबवून किमान आम्ही आहोत त्या परिस्थितीत किमान एक चांगली स्वच्छता मोहीम राबविण्यात येवून पंढरपूरकरांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी तरी बेजबाबदार अधिकारी यांच्याकडे लक्ष केंद्रित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांच्या  वतीने करण्यात येत आहे.