सिद्धेवाडी येथील उजनी कॅनल भूसंपादन बाधित शेतकऱ्यास मोबदला देण्याची मागणी, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) सिध्देवाडी येथील उजनी कालवा क्रमांक 6 करिता 30 वर्षांपूर्वी भूमी संपादन केली मात्र अद्यापही बाधित शेतकऱ्यांना त्याचे मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी कार्यकारी अभियंता उजनी कालवा क्रमांक 9 या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा सिद्धेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच लक्ष्मण गोडसे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे संबंधित विभागाच्या कार्यालयाला दिला आहे केला.
शासन आपल्या दारी या योजनेची शासकीय अधिकारी कशी वासलत लावतात याचे हे मूर्तीमंत उदाहरण असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासनच आपल्या दारी आणि शेतकरी शासनाच्या दारी दयेची भीक मागत आहेत. सिद्धेवाडी पंचक्रोशीतून उजनीचा 33 क्रमांकाचा कालवा खोदला आहे त्यावर 6,7,8 इत्यादी लघु वितरिका आहेत. हक्काचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तीस वर्षे पायपीट करावी लागते ही खेदाची व शरमेची बाब आहे धरणे मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करूनही शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याने शिरगावच्या शेतकऱ्यांनी आता उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 3 सोलापूर व उजनी कालवा कार्यालय मंगळवेढा क्रमांक 9 यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
उजनी कालवा क्रमांक 6 साठी संपादित केलेल्या जमिनीचे पैसे निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पैसे मिळन्यापासून वंचित असलेले शेतकरी इतर मागासवर्गीय शेतकरी आहेत. त्यामुळे शासकीय अधिकारी ही जात पात पाहूनच काम करतात की काय अशी प्रतिक्रिया दबक्या आवाजात शेतकरी व्यक्त करत आहेत.
शासकीय कामाकरिता भूमी संपादन करताना शेतकऱ्यांना त्याचा मोबदला द्यावा अशी सूचना शासनाची व न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असल्याचे सांगितले जाते समृद्धी महामार्ग व इतर महामार्गासाठी संपादित जमिनीचे पैसे विना विलंब दिले आहेत. मात्र येथील शेतकऱ्यांना तीस वर्षे प्रतीक्षा करूनही हाती का निराशा पलीकडे काहीच पडले नाही.
सिद्धेवाडी येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सचिवालय सोलापूर यांच्याकडे अर्ज विनंती करूनही कोणीच दखल घेतली नाही .त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची तीव्र लाट पसरली आहे गेल्या 3 वर्षात कार्यकारी अभियंता उजनी कालवा मंगळवेढा व भूसंपादन कार्यालय क्रमांक तीन सोलापूर यांच्या विरोधात सिद्धेवाडी येथे रास्ता रोको मंगळवेढा येथे मोर्चा व धरणे आंदोलन केले आहे दिनांक 28 ऑगस्ट च्या आंदोलनाची संबंधित अधिकारी दखल घेणार नसतील तर येथील शेतकऱ्यांना आत्मदहनाचा निर्णय घ्यावा लागेल असे शेतकऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.