मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयांमध्ये नागरिकांसाठी १०० काँट उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार - आ.समाधान आवताडे
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै. पंढरी नगरी न्यूज) : मंगळवेढा शहर व तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातून नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी याकरिता लवकरच रुग्णालयामध्ये १०० काँट उपलब्ध करून देऊन व जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी आपण राज्य शासनाकडे मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयातील संदर्भात महत्त्वाची कागदपत्राची फाईल पाठवली असून त्याचा पाठपुरावा सुरु असल्याची मत पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.
मंगळवेढा तालुक्यातील सजग नागरिक संघाने दिल्ली दौरा आयोजित करून ७० जणांनी यामध्ये सहभाग घेऊन स्वखर्चाने एकाच वेळी दिल्लीतील आरोग्य सुविधा व प्राथमिक शिक्षण याचा अभ्यास केल्याबद्दल आमदार समाधान आवताडे यांनी त्यांची कौतुक केले. पंढरपूर मंगळवेढ्याचे लोकप्रतिनिधी म्हणून सजग नागरिक संघ जे काम करीत आहेत त्यांच्या कामाला पाठिंबा देऊन सतत सहकार्य करून शासन दरबारी पाठपुरावा करून सजग नागरिक संघाकडून आलेले प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार समाधान आवताडे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये झालेल्या सजग नागरिक संघाच्या बैठकीमध्ये डॉक्टर शरद शिर्के यांचा फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन पुष्पहार घालून आमदार अवताडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी ग्रामीण रुग्णालयांमध्ये २५ बाय ५० चे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी प्रतिशालय उभा करण्याची घोषणा केली आहे.
आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा शहर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघ. डॉक्टर्स इंजिनियर्स यांच्याशी चर्चा केली. यामध्ये मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयांमध्ये लवकरच १०० बेड उपलब्ध करून दिले जातील यासाठी राज्य शासनाकडे फाईल पाठवली आहे ,केंद्र शासनाकडे देखील फाईल पाठवून त्याचा पाठपुरावा करून लवकरच १०० काँट उपलब्ध करून या हॉस्पिटल मंगळवेढयात सुरु होईल असे आश्वासन आमदार आवताडे यांनी यावेळी दिले. याशिवाय सोनोग्राफी बाबत त्यांनी आरोग्य उपसंचालक वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता मार्च महिन्यापर्यंत ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी चे विविध मशीन देण्याचे अवताडे यांनी स्पष्ट केले. मंगळवेढ्यातील सजग नागरिक संघ काम करीत असलेल्या कामाबद्दल आमदार समाधान आवताडे कौतुक केले.
यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे प्रमुख संजय कट्टे, अँड. भारत पवार, ज्ञानदेव जावीर, अँड .धनंजय हजारे, अरुण किल्लेदार. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रा. येताळ भगत दिलीप जाधव यांच्यासह सर्व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.