दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार आंधळ्याची भूमिका घेत आहे - स्वाभिमानीचे सचिन आटकळे .

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार आंधळ्याची भूमिका घेत आहे - स्वाभिमानीचे सचिन आटकळे .

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) : सध्या सोलापूर जिल्ह्यात दूध आंदोलन चांगलेच पेटले असून शेतकरी आता गावोगाव रत्यावर उतरून लढत असताना दिसत आहे ,आज तालुक्यातील उपरी येथे रास्तो रोको आंदोलन करून चक्क दुधाने अंघोळ करून शेतकऱ्यांनी निषेध केला.या दूध उत्पादकांच्या बाबतीत हे सरकार आंधळ्याची भूमिका पार पाडत आहे असा आरोप स्वाभिमानीचे सचिन आटकळे यांनी केला आणि उग्र आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला.
   
महाराष्ट्रात फक्त सोलापूर जिल्ह्यात च दूधाचे दर पडले असून हा अन्याय शेतकरी खपवून घेणार नाही,कारण सोनाई,हॅटसन,नेचर डिलाईट,प्रभात या सारख्या नामांकित दूध संघाने दूध दर कपात करून शेतकरयांना देशोधडाला लावले असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे,ऐन उन्हाळ्यात कधी ही दूधाचे दर कमी झाले नाहीत मात्र उत्पादन खर्च गगनाले भिडले असून वर्षातून चार वेळा २० ते ५० रुपये पर्यंत पेंडीचे दर वाढलेले असून शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणे अवघड झाले आहे.