पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या ऑपरेटरवर अद्यापही कारवाई नाही?

पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या ऑपरेटरवर अद्यापही कारवाई नाही?

_______________________________________________

पंढरपूर( दै पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील वसुली करणाऱ्या कॉम्प्युटर ऑपरेटर बाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी नोटीस बजावूनही संबंधितावर अद्याप कार्यवाही झाली नसल्याचा आरोप सोलापूर जिल्हा रास्त धान्य दुकानदार संघटनेचे संपर्कप्रमुख नितीन पेंटर यांनी केला आहे. 

पंढरपूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेतील कॉम्प्युटर ऑपरेटर सिद्धेश्वर देठे. बापू कांबळे व सुरज कांबळे हे रेशन दुकानाकडून सक्तीने वसुली करत आहेत युनिट वाढ डाटा फिडींग इ.प्रश्न सोडवण्यासाठी तसेच पंढरपूर आतील प्रोटोकॉल शासकीय सभा व्हीआयपी दौरे यांच्या नावाखाली रेशन दुकानाकडून मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल करतात असा आरोप नितीन पेंटर यांनी केला आहे .

ग्रामीण भागातील रेशन धान्य दुकानदाराकडून फोन पे गुगल पे याद्वारे तगादा लावून रक्कम वसूल केली जाते. ऑपरेटरच्या मनमानी कारभारामुळे पंढरपूर तालुक्यातील दुकानदारांमध्ये सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पुरवठा निरीक्षक, तहसीलदार यांना ही माहिती देण्यात आली होती परंतु त्यांनी या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील कार्यालयातून रेशन धान्य दुकानदारांना बघून घेण्याची भाषा ही केली जात आहे.

याबाबत स्थानिक पुढारी सामाजिक कार्यकर्ते यांच्यामार्फत रेशन धान्य दुकानदाराची माहिती दिली जाते जी माहिती फक्त कार्यालयाच्या लाँगीनवर वर मिळते की पुरवली जाते त्यानंतर संबंधितांकडून दुकानदाराविरुद्ध खोटी तक्रार निर्माण केली जाते आपली रोजची उपजीविका असलेल्या रेशन दुकानदारांना ठराविक रक्कम देण्यास भाग पाडले जाते या प्रकरणी संबंधित ऑपरेटरवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.

या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी पंढरपूर पुरवठा विभागाला नोटीस काढली होती. मात्र पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्या आशीर्वादामुळे ही कारवाई झाली नसल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे .तसेच रेशन दुकानदारांना ना त्रास देणाऱ्या पंढरपूरच्या पुरवठा विभागातील तीन ऑपरेटर बद्दल वारंवार तक्रारी देऊ नाही काही कारवाई झालेली नाही. दुकानदारांमध्ये अद्यापही वसुली करणाऱ्या तिघांची भीती कायम आहेत.

तरी कार्तिकी यात्रेनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याकडे लक्ष घालून दुकानदाराला न्याय मिळवून द्यावा .अशी मागणी सोलापूर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे संपर्कप्रमुख नितीन पेंटर यांनी केली आहे.