पंढरपूर अरुणा भालेकर बी एच एम एस परीक्षेत राज्यात मुलीत प्रथम
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या वतीने सन जानेवारी २०२२मध्ये घेण्यात आलेल्या बी .एस .एम .एस परीक्षेत पंचाचार्य होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी अरुणा अविनाश भालेकर हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पंढरपूर, सोलापूरसह राज्यात तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. अरुणा भालेकर ही मुळची पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील रहिवासी असून अतिशय गरीब कुटुंबातील असून अशा बिकट परिस्थितीत तिने बी एच. एम .एस या परीक्षेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल तिचे तिला शिक्षणासाठी आधार देणाऱ्या आई - वडील यांचे सिध्देवाडी ग्रामस्थांच्या वतीने अतिशय गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीचे कौतुक होत आहे .
अरुणा भालेकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांना जगद्गुरु पंचाचार्य होमिओपॅथिक सोसायटीचे अध्यक्ष एम .जी. वालीखिंडी, महाविद्यालयाचे प्राचार्या. डॉ. राजकुमार पाटील डॉ. रवीकुमार जाधव, डॉ.एम आर कुलकर्णी, डॉ.फर्जना मुकादम, डॉ.हिम्मत पाटील, डॉ. सुहास पाटील डॉ. मिलिंद गायकवाड, डॉ. दिपाली पाटील, डॉ. गीतांजली कोरे, डॉ. वर्षा पाटील, डॉ. महेश पाटील, डॉ. संतोष रानडे, डॉ. दीपक लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या यशाबद्दल सिद्धेवाडी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या सरपंच रोहिणीताई सारंग जाधव ,उपसरपंच लक्ष्मण गोडसे, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव व विद्यमान सदस्य जे .जी जाधव सर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर कॉलेजचे प्राचार्य अरुण जाधव सर, कडेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे, मुंबई येथील गोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, सहाय्यक कृषी अधिकारी आयुक्त पुणे अश्विनी भोपळे- शिंदे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी ता. चंदगड इतिहास तज्ञ प्रा. मधुकर जाधव सर, विठ्ठल सहकारी साखर कारखाण्याचे माजी संचालक गोकुळ जाधव, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नागनाथ शिंदे, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ जाधव, मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. सी.व्ही .जाधव सर, पंढरपूर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक मधुकर जाधव पोलीस पाटील दत्तात्रय जाधव, ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पाटील गुरुजी, पंढरपूर तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नितीन जाधव सर, यशवंतराव चव्हाण सामाजिक प्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष चंद्रदीपक भालेकर इ. उपस्थित होते.*