गौतमी पाटील झळकणार नव्या भूमिकेत, वेब सीरिजमध्ये करतेय पदार्पण...
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) : लावणी डान्सर गौतमी पाटील ही सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या गौतमीवर आतापर्यंत अनेक स्थरातून टिका झाली आहे. मात्र लावणीची आवड असणाऱ्या लोकांमध्ये गौतमी पाटील म्हणजे लोकप्रिय चेहरा आहे.नाक मुरडतच का होईना लोक गौतमी पाटीलची ओळख सांगताना दिसतात. नेहमीच कोणत्या - ना - कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या गौतमी पाटील आता वेगळ्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
आता डान्सर गौतमी पाटील गाणी आणि चित्रपटांसोबतच वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. आपल्या डान्सने तिने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. आता ती वेब सीरिजमध्येही दिसणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. वेब सीरिजमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती स्वत: गौतमी पाटीलनेच प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.