शिरगाव येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे उद्घाटन
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज): पंढरपूर तालुक्यातील शिरगाव येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी सभापती सोमनाथ आवताडे हे आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की,कुठल्याही विकास कामात राजकारण न आणता वाडी - वस्ती, वार्डातील,गावातील आमदार समाधान दादा आवताडे यांच्या माध्यमातून पाणी, रस्ते, वीज, शाळा, आरोग्य आदी कामे करून घेण्याचे आवाहन केले .
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून शिरगाव येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
त्याप्रसंगी पंढरपूर-मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सोमनाथ आवताडे कासेगांव जि.प. जि.प.सदस्य वसंत (नाना) देशमुख,विठ्ठल कारखाना माजी चेअरमन भगीरथ भालके,युवा नेते प्रणव परिचारक,माजी सरपंच औदुंबर घाडगे ,माजी सरपंच दत्तात्रय (मेजर) घाडगे, एकलासपूरचे सरपंच संभाजी पाटील ,पप्पू जाधव ,सरपंच उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.