सोलापूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील २० कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या- जि. प.चे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा आक्रमक पवित्रा...

सोलापूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील २० कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या- जि. प.चे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा आक्रमक पवित्रा...

____________________________________________

सोलापूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील लिपीक राजू गाडेकर ,संजय कांबळे यांच्यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली असल्याचा दुजोरा उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी दिला.. या कारवाईमुळे शिक्षण व  अन्य विभागात वशिल्याने वर्षानुवषे  गुळाच्या ढिपीला चिटकून ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी यामुळे खळबळ उडाली आहे .बहूचर्चीत आणि तक्रार असणाऱ्या २० कर्मचाऱ्यांची मुख्यालयातंर्गत बदली करण्याची कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात या कर्मचार्यांच्या कारभारावर बातमी प्रसिद्ध केली होती.

जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी दिलेल्या माहीतीनुसार प्राथमिक शिक्षण विभागाच्या लाच प्रतिबंध कारवाई नंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कडक धोरण अंमलात आणले आहे. वादग्रस्त आणि एकाच टेबलावर ५ वर्षापेक्षा अधिक कार्यासन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या मुख्यालयातंर्गत करण्यात आल्या आहेत. कनिष्ठ प्रशासनधिकारी २, वरिष्ठ सहाय्यक ०३, कनिष्ठ सहाय्यक १५ अशी बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची आकडेवारी आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामांमध्ये पारदर्शकता येणार आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात झालेले लाचेचे प्रकरण ताजे असतानाच तसेच इतर काही कारणांमुळे जिल्हा परिषद च्या शिक्षण विभागाच्या कामाच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. कामानिमित्त आलेल्या व्यक्तींनी कोणत्याही कर्मचाऱ्यांना न भेटता थेट अधिकारी यांनाच भेटावे असे आदेश कामात कर्तव्यदक्ष असणारे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रशासनाला दिले आहेत.