राजमाता जिजाऊ जयंती पंढरपुरात अभिवादनासाठी शिवप्रेमींची तुफान गर्दी
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( पंढरी नगरी न्युज): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज ४२६ वी जयंती निमित्त साजरी करण्यात येत आहे. राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारीला सिंदखेडराजा इथ राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यात झाला होता. त्यानिमित्त जिजाऊ स्मारकावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.
तर राजमाता जिजाऊंचं पूर्ण कृती पुतळ्यास आकर्षक पुष्पहारांनी सजवण्यात आलं आहे. महिला आणि पुरुष यांनी भगवे फेटे परिधान करून तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा सकाळपासूनच देत होते . छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिजाऊ माँसाहेब यांना अभिवादन करण्यासाठी शहर व तालुक्यातून मोठा जनसागर उसळला होता. जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या ४२६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी चौकातील जिजाऊ स्मारकातील जिजाऊ च्या पुतळ्याचे पूजन ॲड सुकेशनी शिर्के बागल यांच्या हस्ते व मुख्याध्यापिका आशाताईं जमदाडे, अनिताताई पवार, सुमनताई पवार शुभांगीताई भुईटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे, शहराध्यक्ष स्वागत कदम, धनंजय मोरे, संदिप मांडवे, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण, स्वप्निल गायकवाड, पुरूषोत्तम देशमुख, ॲड सत्यम धुमाळ, प्रशांत सुरवसे, नगरसेवक प्रशांत शिंदे,सतिश आप्पा शिंदे, अरूण फाळके, दिगंबर सुडके,जगदीश पवार, विनोद लटके,प्रताप चव्हाण सर,निशांत जाधव सोपान काका देशमुख इ. उपस्थित होते बंटी वाघ यांनी सुत्रसंचलन केले, दिलीप पवार व गायकवाड सर यांनी जिजाऊ वंदना म्हणाले, ॲड सुकेशनी शिर्के बागल, सुमनताई पवार, शुभांगीताई भुईटे यांनी मनोगत व्यक्त केले आभार स्वागत कदम यांनी मानले.