पंढरपूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी केली कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी..!
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) राज्याचे कृषी मंत्री श्नी धनंजय मुंडे पंढरपूर ला आले असता शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वतीने निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून मागणी केली.
गणपती बाप्पा च्या उत्सवा दरम्यान मोठ्या प्रमाणात चिनी बनावटीची प्लास्टिक फुलांची विक्री झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील फुले दरा अभावी रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे, राज्यामध्ये प्लास्टिक विक्री बंद असताना राजरोसपणे प्लास्टिक फुलांची विक्री सुरू आहे येणाऱ्या घटस्थापना नवरात्र उत्सवात प्लास्टिक फुलांची विक्री सुरू राहिली तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. बेदाण्याचे सौदे करत असताना व्यापारी शेतकऱ्याच्या जर किलो बेदाणा व्यापारी स्वतःच्या झोळीत टाकत आहेत.
कृषि विभाग मार्फत ठिबक सिंचन,शेततळे, फळबाग लागवड, कडबाकुट्टी इत्यादी महा DBT योजनाच्या अनुदानाचे पैसे अनेक दिवसापासून मिळत नाही त्यामुळे शेतकरी पैसे गुंतवून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे शेतकऱ्याची कृषि विभाग मार्फत देण्यात येणारी सर्व अनुदाने तात्काळ जमा करण्यात अशा विविध विषयांचे निवेदन मंत्री महोदयांना देण्यात आले.यावेळी स्वाभिमानी चे सचिन पाटील,तानाजी बागल, सचिन आटकळे, सचिन ताटे, सुशिल शिंदे आदि उपस्थित होते.