सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात ,जिल्ह्यात उडाली खळबळ

सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात ,जिल्ह्यात उडाली खळबळ

---------------------------------------------------------------------------------

सोलापूर (पंढरी नगरी न्यूज ) सोलापूर येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक हेमंत नाईकवाडी याला लाज लचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली. तक्रारदाराला सावकारी दाव्याच्या नकला देण्यासाठी त्याने चार हजार रुपयाची लाच मागितली होती पुराव्याची पडताळणी करून लाज लचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली .दरम्यान तक्रारदाराविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयात खाजगी सावकारीचा दावा सुरू होता. त्याला स्थगिती मिळावे म्हणून तक्रारदाराला मुंबई उच्च न्यायालयात अर्ज द्यायचा होता.

त्यासाठी दाव्यातील रोजनाम्याच्या नकला मेळाव्यात म्हणून तक्रारदाराने जिल्हा उपनिबंध कार्यालयाकडे अर्ज केला होता त्या नकला अजूनही मिळाल्या नसल्याने तक्रारदाराने वरिष्ठ लिपिक हेमंत नाईक वाडी यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यावेळी त्याने 4000 रुपयाची लाच मागितली त्याची तक्रार लाच लचपत प्रतिबंधक विभाग कडे करण्यात आली होती .त्याने लाज स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे पुराव्यातून सिद्ध झाल्याने लाच लचकत प्रतिबंध विभागाची उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी उमाकांत महाडिक, पोलीस हवालदार शिरीष कुमार सोनवणे ,पोलीस नाईक, श्रीराम घुगे, नरोटे ,चालक सुरवसे यांच्या पथकानेही कारवाई केली.