विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर फक्त ज्ञानार्जनासाठीच करावा- सुनेत्राताई पवार. सिद्धेवाडीत राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर सुरू

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर फक्त ज्ञानार्जनासाठीच करावा- सुनेत्राताई पवार.  सिद्धेवाडीत राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर सुरू

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) मोबाईल हा माणसाच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला असताना हे सर्वांच्या आयुष्याचे केंद्र बनले आहे असे प्रतिपादन रुक्मिणी सहकारी बँकेच्या चेअरमन  तथा रुक्मिणी महिला विद्यापीठाच्या संस्थापिका सुमित्रा पवार यांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रमसंस्कार शिबिर सिद्धेवाडी ता. पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच रोहिणी जाधव उपस्थित होत्या . पवार पुढे म्हणाल्या की त्यापुढे  की  युगात सर्वात जास्त वापरले जाणारे हे मॉडेल असून विद्यार्थ्यांनी या मोबाईलचा अयोग्य वापर न करता त्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन जीवनात यशस्वी होण्याचा सल्ला देत युट्युब वरील फक्त ज्ञानार्जनासाठी उपयोग करण्याचा संदेश दिला .
 
या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जे ,बी भायगुडे सर ,पत्रकार गणेश गायकवाड , पूजा गायकवाड, उपप्राचार्य नाईकनवरे सर प्रा.डी.एम.चौधरी सर, सुयोग कदम सर , सारंग जाधव ,ग्रामपंचायत सदस्य आप्पा जाधव ,सुरेश गोडसे ,रमेश बनसोडे ,विजय जाधव ,बालाजी जाधव ,दीपक जाधव  ,धनाजी घुले ,साहेबराव जाधव ,शरद जाधव ,सुनील जाधव ,इ .ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते.