बीड येथील तुकाराम कुटे या भाविकांकडून एक लाखाची देणगी;

बीड येथील  तुकाराम कुटे या भाविकांकडून एक लाखाची देणगी;

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) – श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस विठ्ठल भक्त श्री.तुकाराम नाथराव कुटे या दानशुर भाविकाने रूपये एक लाख इतकी देणगी दिली आहे. त्याबद्दल त्यांचा मंदिर समितीचे कर्मचारी श्री.योगेश कागदे यांच्या शुभहस्ते श्रींचा फोटो, उपरणे, लाडू प्रसाद देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. 

श्री.कुटे हे गुळज ता. गेवराई जि. बीड येथील रहिवाशी आहेत. त्यांनी यापूर्वी देखील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस देणगी दिली होती.