*अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सिनेट निवडणूक : संजय मुळे यांचा सुटा संघटनेला जाहीर पाठिंबा..*

*अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सिनेट निवडणूक : संजय मुळे यांचा सुटा संघटनेला जाहीर पाठिंबा..*

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( प्रतिनिधी):-  सोलापूर येथील अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर सिनेट निवडणूक २०२२ साठी होत असलेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मोठी रंगतच वाढल्याचे दिसत आहे. आज पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील पदवीधर मधून उभे असलेले उमेदवार प्रा .संजय मुळे यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेऊन संघटनेला पाठिंबा दिला त्यामुळे सुटा संघटनेचे पारडे सध्या जड झाल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

या पाठिंबामुळे पंढरपूर येथील सुटा संघटनेचे उभे असलेले उमेदवार प्रा. गणपत मोरे यांना त्याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकारी मधून चर्चा होत आहे सुटा संघटनेचे एकूण नऊ उमेदवार या निवडणूक रिंगणामध्ये निवडणूक लढवीत आहेत. या उमेदवारांना वाढता पाठिंबा चांगला फायदा होणार आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष नितीन कोकाटे. हनुमंत अवताडे. विश्वस्त मठपती सर .भरत जाधव सर .भरणे सर .पंचाप्पा वाघमारे .राजेंद्र सूर्यवंशी. संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे. पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमरजीत पाटील .पदवीधर चे उमेदवार गणपत मोरे. दिनेश मुळे. उषा पवार. सुशील कुमार शिंदे, इत्यादी प्राध्यापक वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .निवडणूक 29 सप्टेंबर रोजी होत असून सुटा संघटनेचे पदाधिकारी या कामी प्रचार करीत मतदारापर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे.