गादेगांव ग्रामस्थांच्या वतीने मसाजोगचे सरपंच स्व . संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना १११००० रू .ची आर्थिक मदत सुपूर्त गादेगांव ग्रामस्थांची माणुसकीची चळवळ पोहोचणार महाराष्ट्रभर,
___________________________________________________
शेतीत दैनंदिन काम करणाऱ्या शेत मजूरानीही लावला देशमुख कुटुंबीयांना मदतीचा आर्थिक हातभार आणि म्हणाले ,आम्ही का मागे आम्ही तर तुमच्याबरोबर मदत करताना शेतमजुराचे डोळे पानावले.
******************************************************
बीड (दैनिक ,पंढरी नगरी न्यूज) जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग ग्रामपंचायतीचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील ग्रामस्थांनी वर्गणी काढून आर्थिक मदत म्हणून एक लाख 11 हजार रुपये रोख रक्कम स्वर्गीय देशमुख यांच्या मसाजोग या गावी जाऊन देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याने सबंध महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाकडून गादेगाव ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.

मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी भर दुपारी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती या गोष्टीला आज तीन महिने होत असून देशमुख कुटुंबीय उघड्यावर पडू नये म्हणून त्यांना फूल नाही फुलाची पाकळी म्हणून ही आर्थिक मदत देण्यात आल्याचे गादेगाव येथील ग्रामस्थांकडून सांगण्यात आले संतोष देशमुख यांचा खून करण्यात आलेल्या व संबंधित कटात सहभागी असणाऱ्या आरोपी व पोलीस प्रशासनाच्या विरोधात सकल मराठा समाजाकडून मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून या विषयी हत्त्येचा निषेध म्हणून अनेक आंदोलने ,मूक मोर्चा, गाव खेडी, राज्यातील अनेक शहरे कडकडीत बंद ठेवून मोर्चे काढण्यात आले होते खून प्रकरणात समाविष्ट असणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी असे उद्रेकाचे वातावरण निर्माण झाले होते. सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर देशमुख कुटुंबीय प्रचंड तणावाखाली होते.
याचाच भाग म्हणून त्यांना आर्थिक मदत करण्याचा विडा उचलण्याचा ठराव प्रथमच : राज्यातील पंढरपूर तालुक्यातील गादेगांव येथील ग्रामस्थांना केला स्वर्गीय देशमुख कुटुंबीया बद्दल मायेचा व माणुसकीचा पाझर फुटल्याने गावातील लहान थोर बंधू आणि भगिनींनी सर्वत्रिक लोकवर्गणी जमा करून स्वर्गीय देशमुख कुटुंबीयातील वैभवी देशमुख तिच्याकडे सुपूर्त करण्यात आल्याने गादेगांव ग्रामस्थाचे बीड जिल्ह्यातून तसेच सोलापूर जिल्ह्यातून सकल मराठा समाजाकडून कौतुक होत असून अजूनही माणसातील माणुसकी जिवंत असल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे .