आईसह दोन मुलींचा आगीत होरपळून मृत्यू; नगर हादरलं

आईसह दोन मुलींचा आगीत होरपळून मृत्यू; नगर हादरलं

------------------------------------------------------------------------------------

अहमदनगर (पंढरी नगरी न्यूज ) अहमदनगरमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे दोन मुलींसह आईचा होरपळून मृत्यू झाला आहे. घराला आग लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.दुसरीकडे महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवल्याची चर्चा जोर धरत आहे.

लीलाबाई सुनील लांडगे असं मृत आईचं नाव आहे. तर साक्षी आणि खुशी अशी दोन्ही मृत मुलींची नावे आहेत. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नेमकं काय घडलं याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.