पंढरपूर - मंगळवेढा तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ शेतकरी संकटात

पंढरपूर - मंगळवेढा तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ शेतकरी संकटात

---------------------------------------------------------------------------------------


पंढरपूर;(प्रतिनिधी) :- सोमवारी सायंकाळच्या रिपरिपनंतरमंमं थांबलेल्या पावसाने मंगळवारी सकाळ होताच पुन्हा जोरदार हजेरी लावली त्यामुळे झोपेतून जागा होतात दाराबाहेर पडणाऱ्या पावसाला पाहून लोकांचा चेहरा वैतागवान झाला .पाऊस परत जाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना तो कधी एकदा निघून जातो अशी भावना झाली आहे. सायंकाळच्या हलक्या जोरदार संततीनंतर रात्रभर आकाश ढगाळलेले होते मात्र दररोज सकाळी ऊन पडेल या अपेक्षित असलेल्या नागरिकांना पावसाने जोराचा झटका दिला आहे.

सकाळपासूनच जोरात हजेरी लावली असल्यामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात अनेक पिकाचे नुकसान झाले असल्याचे आमच्या विविध ठिकाणच्या प्रतिनिधींनी सांगितले .ढगांच्या गडगडाटसह जोरात पाऊस येत असून जनजीवन  विस्कळीत होत आहे .सकाळी आकाश निरभ्र होते ऊनही पडते अचानक ढग येतात आणि जोराचा पाऊस सुरू होतो. मंगळवेढा - पंढरपूर तालुक्यात सर्वत्र धुवाधाँर पाऊस झाल्याने या पावसाने ऊस व द्राक्ष बागाचे मोठे नुकसान झाले आहे .

तसेच यंदाचा साखर कारखान्याचा गळीत हंगामही किमान महिनाभर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे .आणि भागात ऊस भोईसपाट झाले आहेत .त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत .बुधवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने नोकरदार वर्गाचे कार्यालयात जाईपर्यंत चांगलेच हाल झाले आहे. पंढरपूर- सांगोला - मंगळवेढा - बार्शी - मोहोळ - उत्तर सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली दिवसभर ऊन पावसाचा खेळ चालू होता.

या ऊन पावसाच्या वातावरणामुळे पंढरपूर - मंगळवेढा परिसरातील नागरिकांचे ऐन  सणासुदीच्या कालावधीत जनजीवन विस्कळीत झाले आहे पावसामुळे विद्युत लाईट सतत फॉल्ट होत असल्यामुळे वीज व पुरवठा करण्यास अडथळा येत असून त्याचा उद्योग व्यवसायावर परिणाम होत आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत याचाही परिणाम यावर होत आहे.