सोलापूरचे आदर्श ग्रंथ मित्र कुंडलिक मोरे ग्रंथालय कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत.. ग्रंथ मित्र मोरे यांच्यावर सोलापूर , लातूर जिल्ह्यातून ग्रंथालय चळवळीतील पदाधिकाऱ्याकडून अभिनंदनचा वर्षाव, ग्रंथालय चळवळीतील आज पर्यंतचे काम व सहकाऱ्यांच्या मदतीनेच मला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने सर्व पदाधिकाऱ्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो, मोहोळचे सुपुत्र तथा औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला सन्मान..

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर (दैनिक,पंढरी नगरी न्यूज ) लातूर जिल्हा ग्रंथालय संघाने कै.अड. त्रंबकदास झंवर आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कार औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांचे हस्ते देऊन ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात सन्मानीत करण्यात आले. शाल, सन्मानचिन्ह, ग्रंथ आणि रोख रुपये 11,000/- देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रंथालयाचे विविध पुरस्कारही वितरण करण्यात आले. राज्यात ग्रंथालय चळवळीचे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याचा पुरस्कार देऊन सन्मान करण्याची प्रथा लातूर जिल्हा ग्रंथालय संघ दरवर्षी करते.

यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक, तथा प्रभारी सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना देशमुख, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, कार्याध्यक्ष ग्रंथमित्र गुलाबराव पाटील, राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष रामेश्वर पवार, लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रभाकर कापसे, राम मेकले, सोलापूरचे (बार्शी) विनोद गायकवाड, छाया मोरे, वृषाली हजारे, प्रकाश मोरे, सारिका माडीकर, सारिका मोरे, गीतांजली गंभीरे, राजश्री माशाळकर, पिंगळे ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.