*लंपी आजारावर मार्गदर्शन करण्यासाठी पशूपालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन :- युवा नेते प्रणव परिचारक यांची माहिती.*

*लंपी आजारावर मार्गदर्शन करण्यासाठी पशूपालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन :- युवा नेते प्रणव परिचारक यांची माहिती.*

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर,(प्रतिनिधी):- पंढरपूर तालुका दूध उत्पादक संघ आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २५ रोजी करकंब व पंढरपूर येथे पशुपालक शेतकरी यांना आधार देण्यासाठी त्याचप्रमाणे राष्ट्रीय नेता राष्ट्रपिता व  आजादी का अमृत महोत्सव या पंधरवड्या निमित्त पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली लंपी आजारा बाबत मार्गदर्शन करण्यासाठी पशुपालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवक नेते प्रणव परिचारक यांनी दिली.

देशात व राज्यातील शेतकऱ्यांच्या हजारो जनावरांना लंपी या विषाणूजन्य त्वचारोगामुळे बाधित होण्याचे प्रमाण वाढल्याने जनावरे मृत्युमुखी पडत आहे. लंपी रोगाचा शिरकाव सोलापूर जिल्ह्यात  झाला आहे.

अशा परिस्थितीत पशुपालकांना आधार देवून त्यांची पशूधन वाचविण्यासाठी या रोगाबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळण्यासाठी करकंब येथील आनंदी मंगल कार्यालय सकाळी १०:०० वा. व पंढरपूर  येथील अर्बन बँकेच्या कर्मयोगी सभागृहात सायं. ४:०० वा. शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे .

यासाठी परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर नितीन मार्कंडे हे मार्गदर्शन करणार आहे .त्याचप्रमाणे पंढरपूर तालुका दूध उत्पादक संघ पशुसंवर्धन विभाग पांडुरंग परिवार यांच्या वतीने विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या आदेशावरून प्रणव परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली.

या बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी डॉ. विश्वास मोरे पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. भिंगारे इत्यादी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते.