बार्शीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

बार्शीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

******************************************************

पंढरी- नगरी न्यूज : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,  बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी येथे सोमवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, सांस्कृतिक विभाग, अग्नी कुल व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जय जगदंबा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वैराग येथील प्राचार्य डॉ. एस एल तांबे तसेच  उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पंढरपूर येथील प्राचार्य डॉ.व्ही डी पांढरे हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस गोरे हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर आयक्यूएसी  समन्वयक डॉ. व्ही पी शिखरे,  सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.एस डी भिलेगावकर, कार्यक्रम समन्वयक डॉ.एम व्ही मते, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. एम एस डिसले, डॉ. पी ए पाटील, डॉ एम एम जडल आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. संपूर्ण देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवसाच्या निमित्ताने राष्ट्राची सुरक्षा, एकता आणि अखंडता बळकट करण्याच्या वचन पद्धतीला एक उत्तम संधी प्रदान केली जाते. म्हणूनच महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. एस एल तांबे व प्राचार्य डॉ व्ही डी पांढरे यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मार्गदर्शन केले. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची ओळख करून दिली. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस गोरे यांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. राष्ट्राच्या एकतेसाठी सर्वांनी समर्पित भावनेने काम केले पाहिजे. स्वतःबरोबरच संपूर्ण देशवासीयामध्ये एकता, अखंडता व सुरक्षितता जोपासना करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपल्या देशाची एकता टिकून ठेवण्यात सरदार वल्लभाई पटेल यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. म्हणूनच राष्ट्राची एकता व सुरक्षिततेत सर्वांनी निस्वार्थी व प्रामाणिकपणे योगदान दिले पाहिजे असे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस डी भिलेगावकर यांनी केले.  उपस्थितांचे आभार डॉ.एम व्ही मते यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील व्हळे यांनी केले. या कार्यक्रमास पीएच डी संशोधन विद्यार्थी, बी एड व एम ए शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.