पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेलेकर यांच्यासह तिघांनी महसूल प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सखोल चौकशी करा - आर.आर. पाटील लोकविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष ,दादासाहेब चव्हाण

पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेलेकर यांच्यासह तिघांनी महसूल प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सखोल चौकशी करा - आर.आर. पाटील लोकविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष ,दादासाहेब चव्हाण

---------------------------------------------------------------------------------
तहसीलदार बेलेकर यांचे वरती आंबे येथील अवैध वाळू प्रकरण व तालुक्यातील गौण खनिज यांची चौकशी मागणीने तहसीलदार यांची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा तालुक्यातून होत आहे.
---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्युज ) पंढरपूर तालुक्याची तहसीलदार सुशील बेलेकर यांनी सन २०१७ ते ४/८/२०२३ या कालावधीत महसूल प्रशासनाची, पर्यावरण विभाग, खानपट्टा परवाना व इतर परवानग्या न घेता तालुक्यामध्ये ३१अवैध्य खडी क्रेशर मालकांचे मोठ्या प्रमाणात भूसुरंग स्फोट घडवीत कोट्यावधी ब्रास मुरूम व दगड यांचे अवैद्य उत्खनन चालू असतानाही वरिष्ठांना कागदोपत्री अवैध धंदे बंद असल्याचे बनावट रेखा रेखा दस्तऐवज तयार करणाऱ्या खडी क्रेशर मालकांवरती गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आर.आर.पाटील लोकविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी पुणे येथील विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिलेल्या निवेदनात दिलेली माहिती -

पंढरपूर तालुक्यामध्ये सन- २०१७ ते ४/ ८/२०२३या कालावधीमध्ये महसूल प्रशासनाची, पर्यावरण विभागाची ,खान पट्टा ,परवाना व इतर परवानग्या न घेता पंढरपूर तालुक्यांमध्ये ३१ अवैद्य खडी क्रशर तहसीलदार सुशील बेलेकर, अप्पर तहसीलदार समाधान घुटुकडे ,खणी कर्म अधिकारी सोलापूर दिव्य वर्मा यांनी पंढरपूर येथील तहसील  कार्यालयामध्ये बसून याबाबतचा कट रचून अवैधरीत्या खडी क्रेशर मोठ्या प्रमाणात भूसुरंग स्फोट घडवीत कोट्यावधी ब्रास मुरूम व दगड यांचे अवैद्य उत्खनन चालू असतानाही संबंधितांनी अर्थपूर्ण संबंध ठेवून कागदोपत्री बंद असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांना महसूल प्रशासनाला व महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवून बनावट लेखा रेखा दस्तऐवज तयार करून शासनाच्या महसूल विभागाचा १७५ कोटी रुपयांचा महसूल यामुळे बुडाला असल्यामुळे शासनाच्या महसूल विभागाचे नुकसान झाल्याचा असल्याचा आरोप दादासाहेब चव्हाण यांनी केला असून फसवणूक केल्याप्रकरणी पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेलेकर व इतर पाच महसूल अधिकारी यांनी स्वतःच्या स्वार्थाच्या स्वार्थासाठी हडप केले असल्याने संबंधित ३१ अवैद्य खडी क्रशर मालकासह महसूल अधिकारी यांच्यावरती १७५ कोटी रुपयांच्या महसूल प्रशासनाच्या फसवणुकीची गुन्हे दाखल करून संबंधित महसूल अधिकाऱ्यांना महसूलच्या सेवेतून कायमचे बडतर्फ करून फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सखोल चौकशी व चौकशीनंतर गुन्हे न दाखल केल्यास आपण दिनांक १४ ऑगस्ट २०२३रोजी विभागीय आयुक्त साहेब कार्यालय पुणे यांचे कार्यालयासमोर बेमुदत हलगी नाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे केला आहे.

तसेच पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील भीमा नदीच्या पात्रातील अवैध अडीच हजार ब्रास वाळू  प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन शिंदे - पाटील यांनी सोलापूरचे  कडक शिस्तीचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेले कुमार आशीर्वाद यांच्याकडे  सखोल चौकशीची ताजी घटना असतानाच पंढरपूर तालुक्यांमध्ये  दादासाहेब चव्हाण यांच्या गौण खनिज तक्रारीमुळे दुसऱ्या धक्कादायक घटनेची भर पडली असल्याने संबंधित तहसिलदार सुशील बेलेकर यांच्या मागे चौकशीचा शिसेमिरा लागल्यामुळे तहसीलदार यांची डोकेदुखी वाढली आहे.

पंढरपूर - मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी संघटना संबंधित तहसीलदार यांच्या अवैद्य व्यवसायांच्या विरोधात आक्रमक झाल्या असून नवीन आलेले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे याबाबत चौकशीअंती काय निर्णय घेणार याकडे दोन्ही तालुक्याचे लक्ष लागले आहे.