कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी मध्ये डॉ. रंगनाथन यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न....
------------------------------------------------------------------------------------
बार्शी, (पंढरी- नगरी न्यूज); भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शीच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने जयंती संपन्न झाली.या प्रसंगी रा.गे .शिंदे महाविद्यालय परंडा येथील ग्रंथपाल डॉ.राहुल देशमुख हे प्रमुख पाहुणे लाभले तर अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .एस. गोरे यांनी भुषवले.
डॉ. राहुल देशमुख यांनी "शिक्षणात ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर" या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. भावी शिक्षक म्हणून आपण तंत्रज्ञानाने समृद्ध असायला हवे,जगात नवनवीन ज्ञान विकसित होत आहे, त्याची माहिती घेऊन विद्यार्थ्यांना बहुश्रूत करावे. असे आवाहन त्यांनी केले.
ग्रंथपाल डॉ. सुनील जाधव यांनी डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जीवन कार्याचा परिचय प्रशिक्षणार्थींना करून दिला. त्याचप्रमाणे ग्रंथालय वापराबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचेअध्यक्ष मा. प्राचार्य डॉ.सुग्रीव गोरे यांनी आपल्या अध्यक्षीय समरोपात ग्रंथालयाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले. आज ज्ञानाचा स्पोट झाला आहे, नेमके त्यातून आपण काय घ्यायचे? याबाबत मार्गदर्शन केले. दररोज वाचन करून आपल्या ज्ञानात भर घालावी. वाचनाने आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी सोडवता येतात. त्याचप्रमाणे आपला आत्मविश्वास वाढतो. कथा, कादंबऱ्या ,संदर्भ पुस्तके , वर्तमानपत्रे, मासिके, पाक्षीके याचे वाचन करावे. आजच्या या आधुनिक युगात टिकायचे असेल तर त्याला तंत्रज्ञानाची जोड आपण द्यावी. तांत्रिक ज्ञान घेऊन आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे अपेक्षित आहे. कोरोना महामारी मध्ये सगळे जग थांबलं होत, त्याला ग्रंथालयेही अपवाद नव्हती. ग्रंथालये बंद अवस्थेत होती, यातून मार्ग म्हणून मानवाने तांत्रिक ज्ञानाचा आधार घेऊन ऑनलाइन माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यातूनच ज्ञान संपादनाचे अनेक मार्ग आपणाला माहीत झाले. आपण वाचन करत असताना बराच भाग आपल्या लक्षात राहत नसतो. म्हणून आपण शिक्षक या नात्याने सर्वांनी दररोज वाचन करून झाल्यानंतर त्याची टिपण लिहून ठेवण्याचा संकल्प करूया असे आवाहन प्राचार्यांनी केले.
पाहुण्यांचा परिचय डॉ. रविराज फुरडे यांनी करून दिला. प्रा.शरद साबळे यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन प्रा. पंकज नरळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल डॉ. सुनील जाधव यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी नॅक समन्वयक डॉ . विष्णू शिखरे बी.पी.एड विभाग प्रमुख डॉ. अनिल कांबळे, एम.पी.एड विभाग प्रमुख डॉ. सुरेश लांडगे, एम. एड.विभाग प्रमुख डॉ. लाजवंती राठोड.तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.