बार्शी येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी..
------------------------------------------------------------------------------------
बार्शी (पंढरी नगरी न्यूज) बार्शी शहरातील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालय बार्शी येथे महाराष्ट्राची ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी येथील नामांकित सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. अमित लाड यांच्या शुभ हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले .यावेळी डॉ. अमित लाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक कार्य व संपूर्ण इतिहास आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला .प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते सुहास सुतार हे उपस्थित होते.
यावेळी सोलापूर ग्रंथालय संघाची मुलुख मैदान तोफ ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास बार्शी शहरातील आबाल, वृद्ध, वाचक, कर्मवीर सार्वजनिक वाचनालयाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी केले.