शेतकऱ्यांचा राजवाडा असणारा भीमा कारखाना महाडिकानी भिकारवाडा केला - चेअरमन बाळराजे पाटील यांची घनाघाती टीका

शेतकऱ्यांचा राजवाडा असणारा भीमा कारखाना महाडिकानी भिकारवाडा केला - चेअरमन बाळराजे पाटील यांची घनाघाती टीका

_______________________________________________

मोहोळ;( दै पंढरी नगरी न्युज ) : कै. सुधाकर पंत परिचारक व माजी आमदार राजन पाटील यांच्या काळातील कर्जमुक्त असणारा भीमा सहकारी साखर कारखाना सध्या कर्जबाजारी झाला असून तो शेतकऱ्यांचा राजवाडा राहिला नसून भिकारवाडा केला असल्याची मत लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी व्यक्त केले. 

टाकळी येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे भीमा बचाव परिवर्तन पॅनलच्या वतीने गुरुवार दिनांक ३ रोजी सभासद शेतकरी यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती .बैठकीच्या अध्यक्षस्थानी भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कल्याणराव पाटील होते.

यावेळी बोलताना लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील म्हणाले की या बैठकीनिमित्त आपण सर्व सभासदांनी भिमा बचाव परिवर्तन पॅनलच्या घड्याळ या चित्रावर मतदान करून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आजची निवडणूक ही सभासद व कामगार कर्मचाऱ्यांनी जास्त पुढाकार घेतला आहे. भीमा कारखान्यावर कै. सुधाकरपंत परिचारक व माजी आमदार राजन पाटील यांनी काटकसऱ्यांनी हा कारखाना चालवून कारखान्यावर एक रुपयाचेही कर्ज नव्हते आज सत्ताधारी धनंजय महाडिक यांनी गेले दहा वर्षापासून ६०० कोटीचे कर्ज केले असून त्याचा सभासदाच्या डोक्यावर भार पडत असल्याचे सांगितले. ही निवडणूक सोलापूर जिल्ह्याचे माजी विधान परिषद सदस्य व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्याच सहमतीने होत असून संत दामाजी साखर कारखान्याचा बदल हा पॅटर्न  मोहोळ तालुक्यात होणार असल्याचे मत चेअरमन बाळराजे पाटील यांनी सांगितले .

यावेळी भीमा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कल्याणराव पाटील म्हणाले की भीमा कारखाना तुमच्या वडिलांनी उभा केला आहे खरे आहे. परंतु माझ्या शेतकरी बांधवांनी आमच्या भगिनींच्या गळ्यातील मंगळसूत्र घाण ठेवून तुम्हाला सभासद होण्यासाठी रकमा दिल्या त्यामुळे हा भीमा कारखाना उभा राहिला हे विसरू नका वाहन मालक व उत्पादक शेतकऱ्यांची दोन्ही वेळेत न दिल्याने सभासदांच्या कुटुंबाची मोठी परवड झाल्याने त्यांना अनेक अडचणी सामोरे जावे लागले त्यांचा सत्ताधाऱ्यांनी कुठेही विचार केला नाही .खासदार धनंजय महाडिक यांनी कारखान्याचे कोणतीही निविदा न काढता मोठ्या प्रमाणात भंगार विकली आणि त्याचे चिरंजीव विश्वराज महाडिक हे भंगार विकण्याचे काम करीत असल्याचे सांगून त्यांना सभासदांनी खड्यासारखे बाजूला सारण्याचे काम या निवडणुकीत करावे.

यावेळी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे .मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असलम चौधरी. भीमा कारखान्याचे माजी संचालक शिवाजी चव्हाण .महेश पवार. दीपक माळी. जालिंदर भाऊ लांडे .रामभाऊ शेळके. बाळासाहेब भोसले महावीर भोसले .सरपंच संदीप पवार. दत्तात्रय काकडे. रमेश पाटील. हरिभाऊ चौरे .अंकुश दळवी .इत्यादी ग्रामस्थ व अंकोली पंचक्रोशीतील सभासद शेतकरी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते.