नितीन उर्फ डी. डी जाधव सर यांना राज्यस्तरीय महात्मा फुले-सावित्रीबाई फुले आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान.

नितीन उर्फ डी. डी जाधव सर यांना राज्यस्तरीय महात्मा फुले-सावित्रीबाई फुले आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान.

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ): पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील शिक्षक नितीन उर्फ  डी .डी जाधव सर यांना  महात्मा फुले सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय दिला जाणारा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार पुणे येथे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पुणे येथील  महात्मा फुले इतिहास अकादमी  यांच्या वतीने महात्मा फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त महाराष्ट्र राज्यातील निवडक प्राथमिक, माध्यामिक व महाविद्यालयीन शिक्षकांना राज्यस्तरीय महात्मा फुले-सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार दिला जातो.


      
या वर्षीच्या हा पुरस्कार मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष  व ज. ने. हायस्कूल सिध्देवाडी येथील सहशिक्षक नितीन उर्फ दिगंबर दतात्रय जाधव यांना राज्याचे आरोग्य मंत्री मा. प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते  पुणे येथे नुकताच प्रदान करण्यात आला. नितीन जाधव सर यांनी मराठा सेवा संघ व शिक्षक कृती समितीचे माजी आमदार दत्तात्रय सावंत  सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील अनेक शिक्षकांना कला, साहित्यिक, शैक्षणिक सामाजिक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांचे प्रश्न मार्गे लावले या कार्याची दखल घेऊन त्यांना पुणे येथील संस्थेने आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. नितीन जाधव सर हे पंढरपूर तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष म्हणून गेली 25 वर्ष काम करीत आहेत तसेच सिद्धेवाडी येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचे ते उपाध्यक्ष म्हणून १० वर्ष काम पाहत आहेत.


     
कार्यक्रमास यावेळी इतिहास अभ्यासक प्रा.डॉ. श्रीमत कोकाटे, राज्याचे माजी शिक्षण संचालक सी.डी. देशमुख, माजी शिक्षण उपसंचालक श्रीमती सुमन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सन्मानाबद्दल माजी शिक्षक आमदार  दतात्रय सावंत. संस्थेचे सचिव जयंत डोंगरे, सहसचिव  दिलीप कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. हा आदर्श गुणवंत पुरस्कार मिळाल्याबद्दल  त्यांचे सर्वत्र अभिनंदनपर कौतुक होत आहे.