सत्ताधाऱ्यांनी भीमा कारखान्यावर कर्जाचा बोजा करून ठेवला

सत्ताधाऱ्यांनी भीमा कारखान्यावर कर्जाचा बोजा करून ठेवला

---------------------------------------------------------
                 अजिंक्यराणा पाटील यांचा आरोप....
---------------------------------------------------------
 दै.पंढरी- नगरी न्यूज : आमच्यावर टीका करण्यापेक्षा सत्तेच्या काळात विरोधकांनी कर्ज काढून बोजाकरुन ठेवल्याशिवाय दुसरी काही काम केले नाही ते अगोदर सांगावे स्व सुधाकर परिचारक व राजन पाटील यांची सत्ता होती त्यावेळी प्रोग्रॅम नुसारच उसाला तोड होत होती शेतकऱ्याला कारखान्यावर हेलपाटे मारण्याची गरज नव्हती मात्र आता औषधे शिवाय उसाची तोड नाही अशी खरमरीत टीका अजिंक्यराणा पाटील यांनी केली टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी भीमा बचाव परिवर्तन पॅनलच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ अजिंक्यराणा पाटील यांनी खवणी कोणेरी तेथे ऊस उत्पादक सभासदांशी संवाद  साधला त्यावेळी ते बोलत होते .ते ते पुढे म्हणाले की दहा वर्षे भीमा कारखान्यात कामगार संघटना मोडीत काढून सत्ताधाऱ्यांनी कामगार आणि शेतकऱ्यांची ससेहोलपट केले असल्याचा आरोप करून शेतकरी व सभासदांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे त्यामुळे आमचा विरोध करण्यापेक्षा आपण काय केलं याची माहिती सभासदांना द्यावी असे आवाहन अजिंक्यराणा पाटील यांनी केली,यावेळी बाळासाहेब भोसले ,अनिकेत भोसले,वैभव गुंड,रामदास भोसले,शिवाजी भोसले ,पोपट काकडे, विकास पाटील ,कुबेर भोसले, महावीर भोसले,अभिजीत भोसले इत्यादी तसेच कोन्हेरी येथील संवाद वेळी देवानंद गुंड कुमार गोडसे,भीमराव जरग बाळासाहेब शेळके, रामचंद्र शेळके समाधान शेळके ,सरपंच गणेश पांढरे, विलास शेळके,रवी गुंड ,अरुण गोडसे,सतीश भोसले ,रामदास चवरे ,बाबुराव शेळके ,अँड महेश माळी ,शंभू शेळके इत्यादी सभासद शेतकरी करमोठ्या संख्येने उपस्थित होते.