रहाटेवाडीचा ऋषिकेश पवार यांची केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय अभियंता म्हणून निवड, मंगळवेढा तालुक्यात आनंदोत्सव साजरा..

रहाटेवाडीचा ऋषिकेश पवार यांची केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय अभियंता  म्हणून निवड,  मंगळवेढा तालुक्यात आनंदोत्सव साजरा..

------------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा( पंढरी नगरी न्यूज ) : तालुक्यातील रहाटेवाडी गावचे सुपुत्र चि.ऋषिकेश ज्ञानेश्वर पवारयांची केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय (D.G.C.A)द्वारा एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीयर या पदावर देशातील सर्वात तरुण अभियंता म्हणून नियुक्ती झाली आहे.

सदर यशप्राप्ती अनुषंगाने पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्राचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते त्यांचा आमदार जनसंपर्क कार्यालयात  अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नवनाथ आबा पवार, माजी उपसभापती सूर्यकांत ढोणे, श्री संत दामाजी शुगरचे ज्ञानेश्वर माऊली पवार, न. पा. प्राथ. शिक्षण मंडळ सदस्य मा. दिगंबर मामा यादव, सरपंच दत्तात्रय धसाडे उपसरपंच नवनाथ पवार, ग्रा. पं. सदस्य उदयसिंह पवार, धनंजय पवार, विकास पवार, दत्तात्रय पवार, राहुल पाटील, .सचिन पवार पांडुरंग पवार, प्रफुल्ल पवार हनुमंत पवार, बबलू पवार, अनिकेत पवार आदी मान्यवर व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते. अभियंता पदीनिवड झाल्याबद्दल श्री .विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गोकुळ जाधव ,वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.