श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा रविवारी मोळीचा शुभारंभ

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा रविवारी मोळीचा शुभारंभ

------------------------------------------------------------------------------------

श्रीपुर (प्रतिनिधी) - श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि. श्रीपुर. ता.माळशिरस या कारखान्याचा सन २०२२ /२३ चा ३२ वा गळीत हंगामाचा शुभारंभ व कारखान्यातील आसवनी प्रकल्प विस्तारीकरण उद्घाटन समारंभ व रविवार दि. १६/१०/२०२२ रोजी सकाळी १०:०० वा. महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते आणि माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे .अशी माहिती श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी दिली.

देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून गौरवलेला व महाराष्ट्र शासनाचा वनश्री सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना असा नवलौकिक म्हणून देशात व राज्यात सर्वत्र ओळखला जात असून कारखान्याचे आर्थिक नियोजन .ऊस तोडणीचे नियोजन. वाहन मालक .व कार्यकत्याशी असणारे सलोख्याचे संबंध तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ .यशवंत कुलकर्णी यांचे कारखाना चालवण्याच्या बाबतीत सर्व व्यवस्थापन नीटनेटके नियोजन व कौशल्य यामुळे कारखान्याला आजपर्यत यशस्वी पुरस्काराची घौडदौड सुरू आहे .

त्यामुळे कारखान्याची आजपर्यंतची गळीत हंगामाची यशस्वी वाटचाल चालू आहे. तरी कारखाना कार्यस्थळावरील गळीत हंगाम शुभारंभ मंगल प्रसंगी कार्यक्रमास सभासद शेतकरी कार्यकर्ते वाहन मालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी केली आहे.