पंढरपूरात "या भागात देखील रस्ता रुंदीकरण होणार की काय"?
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर वासिया मध्ये संभ्रम अवस्था
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज) : श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये पूर्वी अरुंद रस्ते होते या अरुंद रस्त्याची रुंदीकरण १९८४ च्या जवळपास झाले होते. तदनंतर या मंदिर परिसरातील रस्त्यालगतचे दुकाने पुन्हा नव्याने सुरू झाली. चार यात्रेच्या दरम्यान या परिसरामध्ये भाविक भक्तांची गर्दी असते. आता याच परिसरामध्ये कॅरीडोर च्या निमित्ताने आता पुन्हा एकदा या भागातील घरे व दुकाने हटवली जाणार आहेत.
या परिसरातील दुकानदारांनी आपापल्या दुकानाच्या जागेसमोरील भागामध्ये काही प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला. याचा असा परिणाम झाला की गर्दी होते म्हणून या परिसरामध्ये अत्यावश्यक सुविधा या आपत्कालीन वेळेमध्ये आज त्या आवश्यक सुविधा, वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकणार नाहीत. असे असंख्य कारणे सांगून आज कॅरीडोर हा या परिसरात होऊ पाहत आहे. अशी परिस्थिती येथील स्थानिक दुकानदाराने तसेच हात गाडीवाले फेरीवाले या व्यापारी वर्गाने आणलेली आहे. असेच म्हणावे लागेल.
आता सध्या पंढरपूर शहरातील शिवाजी चौक ते स्टेशन रोड ला जाणारा हा रस्ता हा शहरातील मोठा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरच्या दोन्ही बाजूने आज आपणाला चार यात्रा असो किंवा अन्य दिवस असो या रस्त्यावर दोन्ही बाजूने आपणाला अतिक्रमण झालेले दिसून येते. फुटपाथ हा पादचाऱ्यांना चालण्यासाठी असते. परंतु या परिसरातील फूटपाथ आज आपणाला अतिक्रमण केलेले हात गाडी विक्रेते, फळ विक्रेते, नाश्ता सेंटर वाले, कॅन्टीन, छोटे-मोठे दुकान किंवा मागील दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर केलेले अतिक्रमण तसेच असंख्य मोटारसायकली या रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या दिसून येतात. असा हा स्टेशन रोडचा मोठा म्हणवला जाणारा रस्ता अतिशय अरुंद झालेला आहे.
या अतिक्रमणाकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष असते तसेच वाहतूक पोलिसांचे देखील दुर्लक्ष असते असेच सध्या तरी दिसून येत आहे अशीच परिस्थिती जर अजून काही वर्ष राहिली तर या भागामध्ये देखील रस्ता रुंदीकरण हे होऊ शकते. याला जबाबदार हे अतिक्रमण करणारे लोक असतील. या स्टेशन रोड परिसरामध्ये देखील यापुढे रस्ता रुंदीकरण होते की काय ?असेच आज सामान्य जनतेला वाटू लागलेले आहे.