जिद्द- चिकाटी आणि प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास यश निश्चित -- आयपीएस अधिकारी ,राहुल चव्हाण

जिद्द- चिकाटी आणि प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास यश निश्चित -- आयपीएस अधिकारी ,राहुल चव्हाण

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्यूज) : आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून जिद्द ,चिकाटी आणि प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास निश्चितपणे यश मिळाल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन नूतन आयपीएस अधिकारी राहुल चव्हाण यांनी व्यक्त केले. ते पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डी व ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना राहुल चव्हाण म्हणाले की ज्या गावात वाढलो त्या गावातील लहान थोर मंडळीचे संस्कार मला लाभले त्यातून मी शिक्षण घेत  यशस्वीपणे अभ्यास करीत अधिकारी झालो अधिकारी झाल्यानंतर हुरळून न जाता मी प्रामाणिकपणे सर्वसामान्य शेतकरी ,कष्टकरी यांना त्या- त्या कामानिमित्त मदत करणार असून सर्व ग्रामस्थांनी मिळून माझा जो सत्कार सन्मान केला त्याचे रून मी कधीही आयुष्यभर विसरणार नाही असे सांगून सत्कार सोहळा गौरव समितीचे आभार मानले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच शरद रोंगे होते. यावेळी मुख्याध्यापक मच्छिंद्र जगदाळे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान रोंगे यांच्या वतीने त्यांचा सत्कार पर सन्मान करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य नारायण रोंगे, दाजी चंदनशिवे, लक्ष्मण चव्हाण, सुरज रोंगे, मोतीराम  चंदनशिवे, आगंदा चंदनशिवे, नवनाथ नागणे, रेश्मा लिगाडे, भाग्यश्री अवधूत, बालाजी शिंदे, मिलिंद परिचारक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दादासाहेब खांडेकर यांनी मानले.