संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे अनुदान तीन हजार रूपयांपेक्षा जास्त करण्यात यावे - शिवस्वराज्य युवा संघटनेची मागणी..
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज) : संजय गांधी निराधार व श्रावणबाळ तसेच अन्य योजनांतील लाभार्थ्यांच्या अनुदानांची रक्कम ३ हजार रूपयांपेक्षा जास्त करावी. दिव्यांग प्रमाणेच बाकीच्या लाभार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा २१ हजारांवरून ५० हजार करावी. निराधार लाभार्थ्यांच्या मुलांच्या वयाची अट काढून टाकवी. तसेच शासन निर्णयप्रमाणे सर्व योजनांचे अर्ज तलाठी कार्यालयात स्वीकारण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेवून प्रस्थाव सादर करून शासन निर्णय घ्यावा.
निराधार आणि गरिबांना आधार देण्याचे काम राज्य शासन करेल, विशेष सहाय्यमंत्री या योजनेचा लाभ सर्व निराधार यांना करून देतील, निराधार व अंपग यांच्यासाठी शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यासारख्या योजना कार्यरत आहेत. परंतु अंमलबजावणी करताना त्यातील बऱ्याच योजनांसाठीच्या अटी जाचक ठरत आहेत. त्यामुळे राज्यभरातील लाभार्थ्यांकडून चार महत्वांच्या मागण्या होत आहेत. सध्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजना या योजनांकरिता फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा ५० हजार आहे. बाकीच्या लाभार्थ्यांसाठी ही उत्पन्न मर्यादा २१ हजार आहे. दिव्यांग प्रमाणेच बाकीच्या लाभार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा २१ हजारवरून ५० हजार करावी.
सध्या या योजनांमधील लाभार्थ्यांना एक हजार ते बाराशे रूपय एवढे अनुदान दिले जाते. लाभार्थ्यांच्या अनुदानाची ही रक्कम ३ हजार रूपयांपेक्षा जास्त करावी. या योजनांतील अर्जदारांच्या सोयीसाठी २० ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी. अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने सांगली उपजिल्हाधिकारी बरडे मॅडम यांना निवेदन देतांना शिवस्वराज्य युवा संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष मोहन बागल, शिवस्वराज्य महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुजाता चव्हाण, खानापूर तालुकाध्याक्षा स्वाती सूर्यवंशी, आटपाडी तालुकाध्याक्षा माधवी बागल, सांगली जिल्हाउपाध्यक्ष बळीराम जगदाळे, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.