सद्गुरु सिताराम महाराज मंदिरात नाम सप्ताहाचे आयोजन..

सद्गुरु सिताराम महाराज मंदिरात नाम सप्ताहाचे आयोजन..

------------------------------------------------------------------------------------

खर्डी (दै. पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सद्गुरु श्री सिताराम महाराज पुण्यतिथी निमित्त बुधवार दिनांक १६ नोव्हेंबर पासून नाम सप्ताह प्रारंभ झाला असल्याची माहिती सिताराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक रोंगे यांनी दिली .

सद्गुरु सिताराम महाराज पुण्यतिथी सोहळा २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता महापूजा होऊन पुष्पृष्टी होणार आहे या नाम सप्ताह कालखंडात दररोज पहाटे पूजा काकड आरती दुपारी १२. वाजता महाराजांना महानैवद्य महाप्रसाद दुपारी ५ ते ६ प्रवचन सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ त्यानंतर पूजा व आरती रात्री कीर्तन भजन इ. कार्यक्रम होणार आहेत .या काळात श्री सद्गुरू सिताराम महाराज मंदिर भाविकांना दर्शनासाठी फुले ठेवण्यात येणार आहे. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत.

पुण्यतिथी उत्सवाचे नियोजन सिताराम महाराज मंदिर ट्रस्टने केली असल्याचे सांगितले. यावेळी खर्डीचे माजी उपसरपंच पांडुरंग परिवाराचे नेते प्रणव परिचारक सिताराम महाराज ट्रस्टचे अध्यक्ष दीपक रोंगे .ट्रस्ट सचिव बापू केसकर ग्रामपंचायत सदस्य नारायण रोंगे .आणि हनुमंत मंदिर पुजारी .बाळासाहेब मोकाशी .भालचंद्र रोंगे .धनंजय रोंगे .लक्ष्मण रोंगे. हनुमंत रोगे .रमेश हाके पांडुरंग भोसले. उमाकांत रोंगे यांच्या भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.