पंढरपूर येथे सणगर समाज राज्यस्तरीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन...

पंढरपूर येथे सणगर समाज राज्यस्तरीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन...

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) : सणगर समाजाच्यावतीने दि. १४ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समस्त सणगर समाज दैव मंडळीचे अध्यक्ष उमेश ढोबळे यांनी दिली.

श्रीसंत तनपुरे महाराज मठ, स्टेशन रोड येथे  मंगळवार दि. १४ रोजी सकाळी ८ ते ९ दरम्यान आलेल्या समाज बांधवाचे स्वागत करण्यात येवून नोंदणी समारंभ होणार आहे. सकाळी १० ते २वाजेपर्यंत वधु-वर परिचय मेळावा होणार आहे. तसेच सायंकाळी ६-३० वाजाता राज्यस्तरीय सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन ह. भ. प. बद्रिनाथ तनपुरे महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तर वधुवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी ह. भ. प. गुंडा नारायण महाराज सिध्दरस उपस्थित राहणार आहे. मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी गजानन गुरव, पोलीस उपाधिक्षक विक्रम कदम, तहसिलदार  समाज कल्याण सहा.आयुक्त कैलास आढे, पोलीस निरीक्षक अरुण फुगे, मुख्याधिकारी अरविंद माळी, गटविकास अधिकारी प्रशांत काळष, पोलीस निरीक्षक मिलींद पाटील, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, वैद्यकीय अधिक्षक महेश माने उपस्थित राहणार आहे.

राज्यस्तरीय सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त समाजाच्यावतीने गावोगावी जावून समाज बांधवांशी चर्चा करुन जनजागृती करण्यात येत आहे. तसेच मेळाव्यात सहभागी होणार्‍या वधु-वरांना संपूर्ण पोशाख मोफत दिला जाणार आहे. तसेच सायंकाळी वधु-वरांची भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. तरी या विवाह सोहळ्यात समाजबांधवांनी उपस्थित असे आवाहन अ. भा. सणगर समाज मठ ट्रस्ट अध्यक्ष सतिश सादिगले, समस्त सणगर समाज दैव मंडळी उपाध्यक्ष सचिन कारंडे, सचिव ज्ञानेश्वर देवकर, स्वागताध्यक्ष धनंजय कारंडे, कैलास कारंडे यांनी केले आहे.