...अखेर तुंगत येथील नियोजित उड्डाण पुल आहे त्याच ठिकाणी : ग्रामस्थांचे मागणीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..
---------------------------------------------------------------------------------
( सरपंच डाॅ. अमृता रणदिवे घेणार उच्च न्यायालयात धाव )
---------------------------------------------------------------------------------
तुंगत; प्रतिनिधी: (विकास सरवळे) मोहोळ-पंढरपूर-आळंदी या पालखी मार्गावरील तुंगत गावामध्ये होत असणाऱ्या पर्यायी उड्डाण पुलाची उभारणी सोयीच्या ठिकाणी व्हावी यासंदर्भात वेळोवेळी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करून गैरसीयीच्या ठिकाणी त्याची उभारणी करण्याचा घाट चालविला जात आहे. यासाठी आता ग्रामपंचायतीने सदर पुलाचे काम पर्यायी सुचविलेल्या ठिकाणी व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचेसह लोकप्रतिधींना निवेदन देऊन साकडे घातले होते तरीही जनभावनेचा कसलाही विचार न करता आहे त्या ठिकाणीच नियोजित पुलाचे काम सुरू केल्याने यासंदर्भात आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणार असल्याचे सरपंच डाॅ. अमृता रणदिवे यांनी सांगितले.
मोहोळ-पंढरपूर-आळंदी या पालखी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असुन या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. परंतु याच मार्गावर ठेकेदार कर्मचारी आणि केन्द्रीय रस्ते विभागातील अधिकार्यांचे अडेलतट्टु भुमिकेमुळे अतिशय महत्त्वकांक्षी आशा मोहोळ-पंढरपूर-आळंदी पालखी मार्गावर असणाऱ्या तुंगत गावां अंतर्गत एकेरी वाहतुकीमुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना जीव मुठीत धरून ये- जा करावी लागत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांचे या महत्त्वकांक्षी रस्ता चौपदरीकरणाचे निर्णयाचे स्वागत भाविकांसह सामान्य जनतेने कडून करण्यात आले.मागील दोन वर्षापासुन कामे सुरू असताना ठेकेदार कर्मचार्यांचे नियोजन शुन्य कारभारामुळे कित्येक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन कामे सुरू असणार्या ठिकाणी पर्यायी एकेरी मार्गावर दिशादर्शक फलक अथवा कर्मचारी नेमण्यात आले नसल्याने अपघात घडत आहेत. या बाबींकडे प्रशासनाचे लक्ष नाही आणि ठेकेदारास गांभीर्य नाही यामळे स्थानिक लोकांमधुन संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तुंगत गाव रस्त्याचे दोन्ही बाजुस असल्याने या भुयारी मार्गावर उभारण्यात येणारा पुल हा मुख्य ठिकाणापासुन दुर उभारला जात असल्याने गावकर्यांनी यास विरोध करून मध्यवर्ती ठिकाणी पुल उभारण्याची मागणी केली होती. महामार्ग कामातील काही अधिकारी अडेलतट्टुपणाची भुमिका घेतली जात आहे उड्डाणपुलाचे सुरू केलेले काम हे शालेय विद्यार्थांसह वयस्कर नागरिकांसाठी धोक्याचे होते यामुळेच गावातील नागरिकांनी भविष्यात येणार्या अडचणी लक्षात घेऊन पुलाचे काम हे मध्यवर्ती ठिकाणी करण्याची रास्त मागणी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचेकडे केली होती.
मात्र जनभावनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.यासंदर्भात सरपंच डाॅ. रणदिवे म्हणाले, तुंगत गावातून जाणार्या पालखी मार्ग्गावरील नियोजित पुल हा गावकर्यांना सर्वच दृष्टीने गैरसोयीचा ठरणारा आहे, गेल्या ३-४ महीन्यांपासून आपण ब्रीज ची जागा बदलावी यासाठी प्रयत्न करीत आहोत , गावरकर्यांनी पण सहकार्य केले आहे, परंतु महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी मात्र गावच्या मागणीकडे दुर्लक्ष केलेले आहे, सर्वच लोकप्रतिनिधींना आपला मुद्दा रास्त वाटतो परंतु प्रत्यक्षात मात्र लोकप्रतिनिधींना सुद्धा दबावापुढे चार पाऊले मागे यावे लागते असा अनुभव आला आहे. काल खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी तसेच ४-५ लोकप्रतिनिधीं यांच्यासमोर १०-१५ मिनीटे गावचया ब्रीज संदर्भात चर्चा सुरू होती, सर्वच जण गावच्या मागणीला सपोर्ट करतील अशी आशा होती परंतु कोणीही गावच्या मागणीपेक्षा विरोधासाठी एकोपा दाखवला. शेवटी कोणताही तोडगा मिळाला नाही, आपल्या गावातील ब्रीजच्या कामाला सुरूवात झालेली आहे, सरपंच झाली तेव्हापासून आम्ही ब्रीज संदर्भातील मुद्दयाला प्राधान्य दिलेले आहे, सातत्याने प्रयत्न केल्याने केंद्रीय स्तरावरही तुंगत मधील ब्रीज ची चर्चा झाली परंतु प्रशासनाने तांत्रिक मुद्द्यांच्या अडचणी सांगितल्या , खरतर लोकांच्या मागणीला महत्त्व दिले जात नाही, याबाबतीत हुकूमशाहीच आहे असा प्रत्यय येतोय, अनेक प्रयत्नानंतरही गावला न्याय देण्यास राज्य तसेच केंद्र पातळीवरील लोकप्रतिनिधींना अपयश आले. आता यापुढे न्यायालयात धाव घेऊन हायकोर्टात याचिका दाखल करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डाॅ.आबासाहेब रणदिवे यांची तुंगत येथील नियोजित उड्डाण पुलासंदर्भात जिल्हाधिकारी यांचेसह माढा लोकसभा खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर ,विधानसभा आ. समाधान अवताडे, सांगोला आ.शहाजीबापु साळुंखे, माजी आ. प्रशांत परिचारक, माजी आ. दिपक साळुंखे यांचेसोबत चर्चा झाली मात्र एकाही लोकप्रतिनिधीने ग्रामस्थांचे सोयीचा विचार केला नाही. यावेळी माजी उपसरपंच पंकज लामकाने, इंद्रजीत रणदिवे उपस्थित होते.