रांझणी येथील फॉरेस्टच्या जमीनीमध्ये अज्ञात हत्याराने अभिमान मारुती मेटकरी यांचा खून ....... अनवली व राजंणी गावात खळबळ
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज )मौजे रांझणी ता पंढरपुर गावचे हददीतील फॉरेस्टच्या जमीनीमध्ये अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने अज्ञात हत्याराने अभिमान मारुती मेटकरी वय ५५ वर्षे रा. अनवली ता पंढरपुर यांचे डोकीत मारून त्यांना गंभीर जखमी करून त्यांचा निघृण खून केला.
दि. १६/०७/२०२३ रोजी रात्रौ ८:४५ ते दि. १७/०७/२०२३ रोजी सकाळी ०७:१५ वाजणेचे दरम्यान फिर्यादी दिगंबर अभिमान मेटकरी वय २६ वर्षे धंदा वेल्डर रा. मेटकरी वस्ती, अनवली ता पंढरपुर जि. सोलापुर यांचे वडील अभिमान मारुती मेटकरी वय ५५ वर्षे रा. अनवली ता पंढरपुर यांना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून मौजे रांझणी ता पंढरपुर गावचे हददीतील फॉरेस्टच्या जमीनी मध्ये घेवुन जावुन त्यांचे डोकीत पाठीमागुन कोणत्यातरी धारदार हत्याराने मारून त्यांना गंभीर जखमी करून त्यांचा खुन केला म्हणुन यातील मयताचा मुलगा दिगंबर अभिमान मेटकरी यांनी अज्ञात इसमाविरुध्द दिले फिर्यादीवरून पंढरपुर तालुका पोलीस ठाणेस गुर नं ५१६ / २०२३ भादवि कलम ३०२ प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल असुन, सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक मिलींद बी पाटील हे करीत आहेत.
सदर गुन्हयाचे घटनास्थळी मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. अर्जुन भोसले सो, पंढरपुर उप विभाग पंढरपुर, परिवेक्षाधिन पोलीस अधिक्षक साटम मॅडम मंगळेवढा पोलीस ठाणे, परिवेक्षाधिन पोलीस उपअधिक्षक बानकर मॅडम पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सोलापुर ग्रामीण व पंढरपुर तालुका पोलीस ठाणेचे अधिकारी / कर्मचारी यांनी भेट दिली आहे. मा. पोलीस अधिक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे सो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. हिंमत जाधव सो यांचे मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता पोलीसांची वेगवेगळी पथके तयार करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता कशोशीने प्रयत्न चालु आहेत.