मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आता हरियाणा राज्यातून फुल्ल पाठिंबा; 'आंदोलन देशपातळीवर करण्याचा दिला इशारा.'
---------------------------------------------------------------------------------
मुंबई (पंढरी नगरी न्यूज ) मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिल्यामुळे मुंबईत २० जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही.राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी अंतरवाली ते मुंबई या पायी प्रवासाची तयारी करावी', असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातून केले आहे. मुंबईला जाण्याचा मार्ग आणि आंदोलनाच्या तयारीबाबत लवकरच माहिती जाहीर केली जाणार आहे, असेही यावेळी जरांगे म्हणाले.
दरम्यान, आता मनोज जरांगे यांच्या या देशातून पाठिंबा मिळू लागला असल्याचं दिसून येत आहे. हरियाणामधून जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला आहे. हरियाणा मधील पानिपतच्या रोड मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे.
सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल, अशी आम्हाला आशा आहे. मात्र सरकारने महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर आम्ही जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला देशव्यापी आंदोलन बनवू, असा इशारा हरियाणातील रोड मराठा समाजाने दिला आहे.