सिद्धेवाडी गाव कामगार तलाठी यांची चौकशीची मागणी., . निराधार व्यक्तींची दाखल्यासाठी अडवणुक.,
सिद्धेवाडी गाव कामगार तलाठी यांची चौकशीची मागणी., .
निराधार व्यक्तींची दाखल्यासाठी अडवणुक.,
सिद्धेवाडी (तालुका पंढरपूर) - येथील गाव कामगार तलाठी समीर मुजावर हे संजय गांधी निराधार योजनेत समाविष्ट होणेकरीता पात्र लाभार्थ्यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची मागणीची अडवणूक करीत असल्याने तलाठी मुजावर यांची चौकशी करुन त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी लाभार्थी व ग्रामस्थांमधून केली जात आहे.
यासंबंधी तलाठी व तहसील कार्यालय मधील कर्मचारी त्यांच्याकडे चौकशी केली असता तहसिलदार यांनी दि.01 जानेवारी 2022 पासून संबंधित तालुक्यातील तलाठी व मंडलाधिकारी यांची मिटिंग मध्ये प्रत्येक लाभार्थ्यांना यापुढे दाखले देण्यात येऊ नये , निराधार व्यक्तीने यापुढे स्वतः तहसीलदार कार्यालय पंढरपूर येथे उत्पन्नाच्या दाखला पाहिजे असल्यास लेखी टपालाद्वारे मागणी करण्यात यावी अशी तोंडी सूचना देण्यात आल्याचे संबंधित मुजावर यांनी सांगितले आहे.
तदनंतर दिनांक 17/12/2021 रोजी सिंधुबाई शिवाजी वाडेकर. केरबा गणपत शिंदे. फुलाबाई मधुकर भोसले रा. शिरगाव व मारुती रामचंद्र गोडसे. शिवाजी ज्ञानू गोडसे रा. सिद्धेवाडी यांनी वरील प्रमाणे व्यक्तीनी श्रावण बाळ सेवा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पन्नाच्या दाखला मिळावा या करीता संबंधित तहसील कार्यालयाकडे टपालाद्वारे अर्ज केलेला होता. त्यांना अद्याप उत्पन्नाचे दाखले मिळाले नसून महसूल विभागाकडे चौकशी केली असता संजय गांधी निराधार शाखा येथील कर्मचाऱ्याकडून याबाबत सांगण्यात आले की तुमचा अर्ज महसूल नायब तहसीलदार पंडीत कोळी यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले. सदरहू अर्जदार हे नायब तहसीलदार पंडीत कोळी यांच्याकडे चौकशी करण्यासाठी गेले असता संबंधित कोळी यांनी तुमच्या दाखल्याची चौकशी करून संबंधित तलाठ्यांना दाखले देण्याचे सांगितल्याचे असे सांगण्याचे कारण सांगून त्यांनी अर्जदार यांना टोलवाटोलवी करीत असल्याचे दिसून येत आहे. सदर अर्जदार हे निराधार वृद्ध अपंग असून उत्पन्नाचे दाखले मिळणे करता तलाठी कार्यालय तहसील कार्यालय तेथे वारंवार हेलपाटे मारत असून त्यांना गेले आठ महिने पासून दाखले मिळत नसल्याने करावी लागणारी पायपीट होणार नाहक त्रास यामुळे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.
गाव कामगार तलाठी मुजावर खर्डी येथे काम करीत असून त्यांना सिद्धेवाडी एकलासपूर शिरगाव येथील गावाचा पदभार असून तलाठी हे त्यांच्या सोयीनुसार तीन गावातील कामकाज पाहत आहेत त्यामुळे संबंधित गावातील शेतकरी निराधार महिला , विधवा, अपंग, विद्यार्थी यांना विविध प्रकारची शासकीय दाखले लागत असल्याने संबंधित तलाठी दाखल्यासाठी अडवणुक असल्याने सिध्देवाडी, एकलासपूर व शिरगाव गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने ग्रामस्थांमधून तलाठी मुजावर यांची सखोल चौकशी करुन त्यांचेवर कायदेशिर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
तहसिलदार यांनी गांव कामगार तलाठी व मंडल अधिकारी यांची मिटींग घेवून गाव पातळीवर मिळणारे संजय गांधी निराधार व्यक्तींना मिळणारे उत्पन्नाचे दाखले बंद करण्यात आलेले आहे. शासन एकीकडे शासकीय योजनांची महिती सर्वसामान्य पर्यंत पेाहचवा व त्याचा लाभ समाजातील वंचित घटकांना मिळावा या करीता प्रयत्नशिल असते मात्र पंढरपूर तहसिल कार्यालयात, अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे तसेच महसुल विभागाचा कारभार हा सावळा गोंधळ असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. याबाबत चौकशीअंती वरिष्ठ अधिकारी, सावळा गोंधळाबाबत कार्य निणर्य घेणार याची चर्चा लाभार्थी व नागरीकांमधून होत आहे.