कुत्रे रात्रीच्या सुमारास का रडतात? कारण वाचून वाटेल आश्चर्य

कुत्रे रात्रीच्या सुमारास का रडतात? कारण वाचून वाटेल आश्चर्य

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज )कुत्र्यांना भविष्यात होणाऱ्या घडामोडी आधीच समजतात असे मानले जाते. या घटना त्यांना कळताच ते रडून इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतात असे म्हटले जाते. पण खरंच तसं असतं का?यामागे नेमके कारण काय आहे? कुत्रे रात्रीच्या सुमारास रडू लागले तर ते नेमके कसले संकेत आहे? जाणून घ्या या संदर्भात

धार्मिक मान्यतेनुसार, असे म्हटले जाते की जर तुमच्या घराबाहेर रात्री खूप वेळ कुत्रा भुंकत असेल किंवा रडत असेल तर काही वाईट घटना घडू शकतात. त्यामुळे तुम्ही सावध होण्याचाही सल्ला देण्यात येतो. पण कुत्रे रात्रीच्या सुमारास नेमके का रडतात?

अप्रिय घटना

असे मानले जाते की, भविष्यातील धोका किंवा वाईट घटनांचा अंदाज कुत्र्यांना आधीच येतो. त्यामुळेच ते रडून किंवा भुंकून इतरांना त्याबाबत सांगण्याचा प्रयत्न करतात.

रात्रीच्या सुमारास कुत्रा रडणे किंवा भुंकणे

तुमच्या घराबाहेर रात्रीच्या सुमारास कुत्रा रडत असेल किंवा भुंकत असेल तर काळजी घेण्याचा सल्ला अनेकजण देतात. कारण, भविष्यात घडणाऱ्या वाईट घटनांचे त्यांना आधीच संकेत मिळतात असे मानतात. तुमच्या घरातील एखाद्या सदस्याला गंभीर आजार अजाराने पीडित होण्याचे संकेत सुद्धा देते.

नकारात्मक शक्ती

असे म्हणतात की, तुमच्या घराबाहेर किंवा घराच्या दरवाजाजवळ रात्रीच्या सुमारास कुत्रा रडत असेल तर त्याच्या आसपास एकप्रकारची नकारात्मक शक्ती किंवा ऊर्जा असू शकते. या नकारात्मक शक्तीमुळेच कुत्रा रात्रीच्या सुमारास भुंकतो असे सांगण्यात येते.

पाळीव कुत्र्याचे रडणे

अनेकजण घरात श्वान पाळतात. घरातील कुत्रा अचानक रडू लागला किंवा आपले अन्न, खाणे-पिणे बंद केले तर तुम्ही सावध व्हावे. कारण, कुत्र्यांना काही अप्रिय घटनांची चाहुल आधीच लागते असे म्हणतात. याचा आणखी एक अर्थ असा की, तुमच्या घरावर एखादे मोठे संकट येण्याची शक्यता आहे.