खेडभाळवणी ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : खेड-भाळवणी ग्रामपंचायत कार्यालयात - परमपूज्य भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली .ग्रामपंचायतीचे सरपंच डाॅ. संतोष साळुंखे-पाटील यांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच शहाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य, लक्ष्मण साळुंखे-पाटील, अरविंद चव्हाण, जयसिंग मस्के, ग्रामविकास अधिकारी, येलपले भाऊसाहेब, बापु बाबर, विकी ढावरे, अनंता मस्के, राजेंद्र कांबळे, ग्रामपंचायत शिपाई, कोरे व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.