महायुती सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ज्यादा दर दिल्याबद्दल पंढरपुरात रयत क्रांती संघटनेने पेढे वाटून केले स्वागत..
---------------------------------------------------------------------------------
शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण ---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) रयत क्रांती संघटनेच्या वतीने महायुती सरकारने दुध उत्पादक शेतकर्यांना दुध दर वाढवून दिलासा दिल्याबद्दल नामदेव पायरी पंढरपूर येथे एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला. राज्य सरकारने दुधाचा हमी भाऊ 3/5 ते 8/5 ला 25 रूपये ऐवजी 34 रूपये करून राज्यातील दुध उत्पादक शेतकर्यांना न्याय दिला .
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन महिन्यात दुध परिषद झाली रस्ता रोको झाले .त्यामुळे राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेऊन पुणे येथे राज्याचे दुग्ध विकास मंत्री ना .राधाकृष्ण विखे -पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन दुध दरवाढी समीती स्थापन केली.
ह्या समितीत शेतकरी नेते सदाभाऊ खोत व राज्यातील खाजगी व सहकारी दूध संघाचे चेअरमन होते ह्या समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्त केला आणि राज्याचे दुग्ध विकास मंत्री मा ना राधाकृष्ण विखे- पाटील यांनी घोषणा केली तसेच मिटिंग मध्ये राज्यातील दुध भेसळीवर आळा घालण्यासाठी प्रतेक जिल्हातील उपजिल्हा अधिकारी व अॅडीशनल एस. पी यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमून लवकरच धाडी टाकून कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत, ज्याप्रमाणे शेती पिकांचा विमा एक रुपयात तसा एक ते दोन रुपयात गाईचा विमा उतरवला जाणार आहे तसेच पशुखाद्याची किमंत पंचवीस टक्के कमी करण्यात येणार आहे असे आश्वासन दिले आहे.
आज जल्लोष करताना रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दिपक भोसले, नंदकुमार व्यवहारे, बाळासाहेब बोबडे, रूपेश वाघ ,राहूल पवार ,नेताजी नागणे,बबलू ताड,संतोष शेळके,महेश बचुटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.