नवोदय विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन..!
___________________________________________________
तुळजापूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : येथील जवाहर नवोदय विद्यालयात आज मंगळवार दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी संविधान निर्माते ,क्रांतीसुर्य, भारतरत्न , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री. गंगाराम सिंह यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते . संविधान भालेराव या विद्यार्थ्याने आंबेडकरांचे कार्यावरती आपले विचार व्यक्त केले. शेवटी विद्यालयाचे प्राचार्य श्री .गंगाराम सिंह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना कशा पद्धतीने निर्माण केली हे सांगून त्यांचे कार्य असे महान होते हे सांगून एक उत्तम कायदामंत्री, पत्रकार, उत्कृष्ट वक्ते, उत्तम वकील, स्वातंत्र्यसैनिक म्हणून कसे कार्य केले याच्यावरती आपले विचार व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांचे वतीने आदरांजली वाहून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन श्री एच .जी. जाधव यांनी केले.