गुरसाळे भीमानदी पात्रात अवैध वाळू उपसा प्रकरणी अखेर दोघांवर पोलीसात गुन्हा दाखल वाळूचोरी विरुद्ध गुन्हा नोंदवून घेण्यास पोलिसांकडून ना - चा पाडा, दिवसभर चर्चेचा विषय
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) गुरसाळे येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे यांनी गुरसाळेत प्रत्यक्ष जाऊन मोठी कारवाई केली. याप्रकरणी पंकज कोळेकर पांडुरंग भिंगारे यांच्यासह आठ ते दहा जनावर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. यात एक डंपर जप्त केले. याप्रकरणी आठ ते दहा जणांविरुद्ध अखेर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप पर्यंत कोणासही अटक करण्यात आलेली नाही. या कारवाईने वाळू चोरट्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

अवैध्य वाळू उत्खनन केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरता गेलेल्या महसूल च्या कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून प्रथमदर्शनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ करण्यात आली असल्याचे चर्चा दिवसभर तहसीलदार कार्यालय आवारात होत होती. पोलीस हे टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आल्याने महसूल च्या संबंधित कर्मचारी यांनी तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या कानावर ही हकीगत सांगितल्यानंतर तहसीलदार लंगुटे यांनी कायद्याचा बडगा उगारत संबंधित पोलिसांचे कान टोचले असल्याचे चर्चा नागरिकांमधून होत होती.

पंढरपूर तालुक्याच्या मध्यभागातून वाळूची खाण असलेली भीमा नदी वाहते. त्यातून अवैध वाळू वाहतुकीचा कहर झाला आहे. पंढरपूरचे नूतन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी तहसीलदार पदाचा पदभार घेतल्यानंतर प्रथमच तालुक्यात मोठी कारवाई केली होती. त्यामुळे वाळू व्यवसायिकांमध्ये मध्ये कमालीची दहशत पसरली होती. काल सकाळी त्यांनी स्वतःसापळा रचून भीमा नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली. ज्यात पाच डंपर, पाच ट्रॅक्टर व दोन 'जेसीबीं'चा समावेश आहे. पंकज कोळेकर ,पांडुरंग भिगांरे रा गुरसाळे ता.पंढरपूर इतर आठ ते दहाजण आहेत .त्याच्याकडील जप्त वाहनांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भीमा नदीपात्रात पहाटे सापळा रचून कारवाई केली आहे.
तालुक्यामध्ये चालणाऱ्या अवैद्य वाळू व्यवसायका विरुद्ध कारवाई करण्याकरीता दिनांक 31 /4 /2024 रोजी आदेश नुसार पथक तयार केले होते ,याबाबत आदेश निर्गमित केला आहे .त्याप्रमाणे आम्ही पथकातील तलाठी अमर पाटील, विष्णू व्यवहारे, सुधाकर चंदनशिवे, सुधाकर हिंलाळ सरकारी लोकसेवक मिळून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तसेच गस्त करून वाळू वाहतूक करणारे वाहन अगर इसम मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याकरीता तहसीलदार यांचे शासकीय वाहन बोलोरो नंबर MH.13 .DT / 1913 मधून मौजे गुरसाळे तालुका पंढरपूर येथे भीमा नदीच्या पात्रामध्ये पहाटे 4: 30 वा. सुमारास गेलो असता त्यावेळी तेथे पाच टिपर, एक जेसीबी ,दोन यारी बसवलेले ट्रॅक्टर इत्यादी साधनांच्या साह्याने भीमा नदीच्या पत्रातील वाळू अवैधपणे उत्खनन करून वाळू चोरी करीत असल्याचे दिसल्याने आम्ही त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला पाहून तिथे असलेली आठ ते दहा लोकांनी आमचेवर दगडफेक करून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यानंतर आम्ही परिस्थिती पाहून सदरची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांना फोनद्वारे कळविले त्यानंतर तहसीलदार सचिन लंगुटे यांनी स्थानिक सज्जाचे तलाठी सुशील तपसे व रोपळे मंडल अधिकारी बाळासाहेब कदम यांना मदतीकरता गुरसाळे येथे पाठवून दिले. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणचे टिपर जीसीबी ट्रॅक्टर इत्यादी वाहने कारवाई करता ताब्यात घेत असताना पळून गेलेले आठ ते दहा इसम परत आले. त्यावेळी त्यांचे पैकी दोन इसमांच्या हातात तलवारी ,व दोघांच्या हातात लोखंडी कोयते होते ,त्यांनी महसूल पथकावर दगड फेकून आमचे अंगावर पळत येऊन यांना खलास करा ,मारा ,सोडू नका ,धरा असे म्हणून परत शिवीगाळ करून दगडफेक करू लागले या भीतीने पथकातील कर्मचारी तेथून बाजूला थांबले तरी देखील आलेल्या इसमानी आमच्यावर पुन्हा दगडफेक करून दहशत निर्माण करून आम्ही लोकसेवक कारवाई करत असलेले एक जेसीबी दोन यारी लावलेले ट्रॅक्टर व तीन टिप्पर चालू करून आम्हाला त्यांच्याकडे असलेल्या शस्त्राचा धाक दाखवून तिथून वाहने पळवून घेऊन गेले त्यानंतर एक टिपर चालू न झाल्यामुळे तो तिथेच सोडून गेली तो टिपर घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करीत होते त्यावेळी घटनास्थळी पोलीस आल्याचे पाहून ते लोक तिथून टिप्पर जागेवर सोडून पळून गेले झालेल्या दगडफेकी मध्ये तहसीलदार सचिन लंगुटे यांची शासकीय वाहन महिंद्रा बोलेरो नंबर एम .एच. १३ डीटी 1913 ही मागील दरवाजाची काच फुटून सुमारे दहा हजार रुपयाचे नुकसान झाले आहे .त्यानंतर तहसीलदार यांना कळविल्यामुळे आमचे मदतीकरता मंडळ अधिकारी विजय शिवशरण, मंडल अधिकारी रवी शिंदे, मंडळ अधिकारी रिंगण चव्हाण ,मंडल अधिकारी दीपक शिंदे, भंडीशेगावचे तलाठी श्रीकांत कदम व इतर महसूल अधिकारी कर्मचारी हे देखील उपस्थित होते .त्यानंतर आम्ही पथकाने घटनास्थळी असलेल्या दोन लाकडी होड्या जेसीबीच्या साह्याने फोडून नष्ट केल्या व तेथे आलेले गुरसाळे गावची स्थानिक रहिवासी यांचे कडून व तलाठी सुशील तपासे यांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, दगडफेक करणारे इसमापैकी पंकज कोळेकर पांडुरंग भिंगारे हे वाळू चोर करणारे लोकांपैकी आहेत यांची नावे स्थानिक लोकांकडून समजली आहेत त्यानंतर तिथे असलेल्या एक टिपर ताब्यात घेऊन पंढरपुर येथील शासकीय गोदाम येथे जमा करण्यात आला. सदर वाहनांचा नं. पाहिले असता एक वाहनाचा वजन केलेली पावती सापडली असून त्यावर तिचा क्रमांक एम .एच. 17 -84 53 असा असल्याचे नमूद करण्यात आले आहे वरील सर्व इसम हे 25 ते 35 वयोगटातील होते .भीमा नदीच्या पात्रातील वाळू अवैद्यपणे उत्खनन करून वाळू चोरी करत असलेले पंकज कोळेकर ,पांडुरंग भिंगारे व इतर आठ ते दहा इसमानी आम्ही आमचे शासकीय काम करीत असताना आमचे वर दगडफेक शिवीगाळ करून त्यांचे हातातील शस्त्राचा धाक दाखवून आम्हास जिवे मारण्याची धमकी देऊन आमचे सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे म्हणून त्यांचे विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे असे फिर्यादी मंडलाधिकारी दिलीप सुरवसे दिली आहे.
आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक प्रकरणी ही आतापर्यंत सर्वांत मोठी कारवाई झालेली आहे. यामुळे वाळूचोरांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. आज दिवसभर याच कारवाईची शहरात चर्चा सुरु होती. यामुळे अवैध वाळू वाहतुकीला लगाम बसेल अशी अपेक्षा होत आहे. गुरसाळे भीमा नदीच्या पात्रात राजरोसपणे वाळू चोरी होत असल्याने येथील संबंधित बीट हवालदाराची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरीत असल्याची चर्चा होत आहे.