पोलीस काँ. सुनील पवार ,पोलीस काँ .रमेश जाधव यांना मराठा सेवा संघाच्या पुरस्काराने पंढरपुरात सन्मानित

पोलीस काँ. सुनील पवार ,पोलीस काँ .रमेश जाधव यांना मराठा सेवा संघाच्या पुरस्काराने पंढरपुरात सन्मानित

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्युज ) पंढरपूर तालुका मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त सण 2023 या वर्षाचा  देण्यात येणारा पोलीस दलात कर्तव्यनिष्ठ व उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल पंढरपूर शहर पोलीस स्टेशन कार्यालयातील आदर्श पोलीस मित्र पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार व पोलीस कॉन्स्टेबल रमेश जाधव यांना पंढरपूर येथील मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्या शुभहस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य उत्तमराव माने होते.

पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार  व पोलीस कॉन्स्टेबल रमेश जाधव यांनी पोलीस दलात सेवा  बजावत असताना आपल्या कर्तव्यात वेळोवेळी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन पंढरपूर येथील मराठा सेवा संघाने उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना  हा अनमोल मोलाचा पुरस्कार मराठा समाजाच्या प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला . हा कार्यक्रम पंढरपुरातील विठ्ठल इन कार्यालयात पार पडला.

या कार्यक्रमात विशेष सत्कार म्हणून अकूताई उलभगत शिवछत्रपती राज्य पुरस्कार प्राप्त खेळाडू यांचाही सत्कार करण्यात आला .कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तात्यासाहेब पाटील, पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मारुती लिगाडे , संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, संत तुकाराम महाराज साहित्य परिषदेच्या विभागीय कार्याध्यक्ष सुमनताई पवार, पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर सूर्यवंशी ,पंढरपूर संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष दत्ता ताड, करकब ग्रामपंचायतचे सदस्य विवेक शिंगटे, पंढरपूर शहर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष स्वागत कदम ,मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष नितीन जाधव, कार्याध्यक्ष एम .एन गायकवाड, सचिव नितीन आसबे व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.