पंढरपूर शहर वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याच्या श्रीमुखात लगावली, दोघांना पोलिस कोठडी. शहरात अवैद्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात बोकाळल्याचा परिणाम
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) : वाहन चालविण्याचा परवाना मागितला म्हणून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी अकरा वाजता शहरातील सावरकर चौक येथे घडली आहे. याबाबत पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, पोलिस कॉन्स्टेबल विजय कोळवले, शिवाजी आवटे हे शहरातील सावरकर चौक येथे रविवारी (ता. ७) ११ वाजता सरकारी गणवेशात शासकीय काम करत होते. या दरम्यान प्रवीण तानाजी लवटे (वय २५, रा. महूद, ता. सांगोला, जि. सोलापूर), नितीन तानाजी लवटे (वय २२, रा. महूद, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांना पोलिसांनी वाहन चालवण्याचा परवाना मागितला. मोटारसायकल चालविण्याचा परवाना दाखविण्याच्या कारणावरून दोघांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच शिवीगाळ, दमदाटी करून विजय कोळवले यांना चापट मारली. तसेच शासकीय काम करत असताना हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ, दमदाटी केली, अशी फिर्याद दिली आहे. याबाबत त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.