कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी..
अकलूज (प्रतिनिधी):- माळशिरस तालुका येथील शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित सदाशिवनगर येथील कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सर्जेराव जाधव सर होते यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक पोपट देठे .उप मुख्याध्यापक सर्जेराव जाधव यांनी पुष्पहार घालून महात्म्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमुख्याध्यापक जाधव बोलताना म्हणाले की महात्मा गांधींचे सत्य अहिंसा असहकार चळवळ मिठाचा सत्याग्रह आणि इंग्रजांच्या जोखंडातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांनी भारतीय जनतेला स्वतःचा न्याय हक्कासाठी दिलेले उपोषणासारखे हत्यार यांची माहिती दिली महात्मा गांधी यांचा जीवनपट कार्य संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहे असे विचार व्यक्त केले .याप्रसंगी गरीब शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेले आणि भारताचे सर्वोच्च पद भूषवलेले पंतप्रधानपद भूषवणारे संकट समय पाकिस्तानने ज्या वेळेला भारतावर आक्रमण केले त्यावेळी संपूर्ण भारतीय सैनिक सैनिकाला पाठबळ देण्याकरता आणि सैनिकांना प्रोत्साहन देण्याकरता जय जवान जय किसान हा नारा दिला आणि पाकिस्तानने केलेले आक्रमण सक्षमरित्या परतवून लावले अशा या मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आपले कार्य घडवून आणलेल्या दोन्ही थोर राष्ट्र पुरुषांनी देशासाठी मोलाचे कार्य केले असे विचार व्यक्त केले .यावेळी प्रा. बाळासाहेब काशीद. प्रा.एस. व्ही जाधव सर. निंबाळकर सर. देशमुख सर. काळे सर. इत्यादी शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख किशोर जाधव सर यांनी केले.